लंडन, 10 ऑगस्ट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडने (India vs England 2nd Test) टीममध्ये बदल केले आहेत, त्यामुळे टीम इंडियापुढची अडचण वाढू शकते. इंग्लंडने ऑलराऊंडर मोईन अलीचा (Moeen Ali) टीममध्ये समावेश केला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार मोईन अली आजच इंग्लंडच्या टीममध्ये दाखल होईल आणि सराव सुरू करेल. इंग्लंडच्या टीममध्ये सध्या बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स नाहीत, त्यामुळे टीममध्ये ऑलराऊंडर खेळाडूंची कमी आहे. या कारणासाठी ऑफ स्पिनर असलेल्या मोईन अलीला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मोईन अली द हंड्रेडमध्ये (The Hundred) बर्मिंघम फिनिक्सकडून खेळत होता. एकच दिवसाआधी त्याने 28 बॉलमध्ये 59 रन केले. मोईन अली बर्मिंघमचा कर्णधारही आहे, तसंच टीम 6 पैकी 4 मॅच जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मोईन अलीने मागची टेस्ट भारताविरुद्धच चेन्नईमध्ये खेळली होती. भारताने हा सामना 317 रनने जिंकला असला, तरी मोईन अलीने मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या आणि 49 रन केले. या चांगल्या कामगिरीनंतरही मोईन अलीला इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीनुसार आराम दिला, त्यामुळे तो घरी निघून गेला. मोईन अलीने इंग्लंडकडून 61 टेस्टमध्ये 189 विकेट घेतल्या. भारताविरुद्ध त्याने 7 टेस्टमध्ये 22.22 च्या सरासरीने 31 विकेट मिळवल्या. भारताविरुद्ध त्याने घरच्या मैदानात दोनवेळा 5 विकेटही घेतल्या आहेत. गुरुवारपासून लॉर्ड्सवर भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी टेस्ट सुरू होणार आहे. नॉटिंघममधली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.