जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या ५१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ३२४ धावाच करू शकला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दुसरा डाव 258 धावांवर घोषित करून बांगलादेशला 513 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ३२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने कसोटी 188 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताने पहिल्याच सत्रात बांगलादेशचे उर्वरित फलंदाज बाद करत विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 90 धावा तर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. हेही वाचा :  लिओनेल मेस्सी ते किलियन एमबाप्पे.. हे 6 खेळाडू स्वबळावर जिंकू शकतात फायनल बांगलादेशने चौथ्या दिवशी 6  बाद 272 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी पहिल्या सत्राची सुरुवात चांगली झाली. मात्र मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला बाद केलं. त्यानंतर शाकिब अल हसन वेगाने धावा करत होता. पण कुलदीप यादवने त्याला बाद करून भारताच्या विजयातला अडसर दूर केला. त्यानंतर कुलदीपने इबादत हुसैनला बाद केल. तर अक्षर पटलेने तइजुल इस्लामलचा त्रिफळा उडवत भारताला विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात