मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Smriti Mandhana ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी, खास क्लबमध्ये मिळाली एन्ट्री

Smriti Mandhana ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी, खास क्लबमध्ये मिळाली एन्ट्री

Smriti Mandhana

Smriti Mandhana

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup) अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सामन्यात बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. अनुभवी डावखुरी सलामीवीर मानधनाने या सामन्यात 17वी धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 22 मार्च: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup) अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सामन्यात बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. अनुभवी डावखुरी सलामीवीर मानधनाने या सामन्यात 17वी धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी मंधाना ही भारताची तिसरी महिला ठरली आहे. याआधी कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू हरमनप्रीत कौर यांनी पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

स्मृती मंधाना महिला विश्वचषक 2022 च्या 22 व्या साखळी सामन्यात 30 धावांवर बाद झाली. तिने 51 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. मंधानाला मोठी खेळी करण्यात अपयश आले.

डावखुरी फलंदाज स्मृती मंधानाने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2717 धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 325 धावा केल्या आहेत, तर महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या बॅटमधून 1971 धावा झाल्या आहेत.

अशाप्रकारे तिने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. याआधी भारताच्या कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ही कामगिरी केली आहे.

मंधानाने एकदिवसीय सामन्यात एकूण 6 आणि कसोटीत एक शतक केले आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 86 धावा आहे.

मंधानाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये 250 हून अधिक धावा केल्या आहेत. तिची सर्वोत्तम धावसंख्या 123 धावा आहे. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

First published:

Tags: Cricket news, Indian women's team, Mithali raj, Smruti mandhana, World cup india