मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /हे कुणी केलं? आपल्याच गोलंदाजी स्टाइलबद्दल वाचून अश्विनने विचारला प्रश्न

हे कुणी केलं? आपल्याच गोलंदाजी स्टाइलबद्दल वाचून अश्विनने विचारला प्रश्न

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियाला धोकादायक ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे.

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियाला धोकादायक ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे.

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियाला धोकादायक ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 05 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होणार आहे. भारतासाठी ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नागपूरमध्ये यातला पहिला सामना खेळला जाणार आहे. मालिकेची सुरुवात होण्याआधी फिरकीला पोषक खेळपट्टी आणि फिरकीपटूंची चर्चा होत आहे.

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियाला धोकादायक ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. रविचंद्रन अश्विन  राइट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. याशिवाय त्याने अनेकदा मोक्याच्या क्षणी फलंदाजी करून भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे आणि विजयसुद्धा मिळवून दिला आहे.

हेही वाचा : पाकिस्तानने 19 वर्षांच्या क्रिकेटरला केलं DSP; भारताविरुद्ध केलेलं पदार्पण

आर अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याआधी ट्विटरवर एक गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने प्लेअरच्या प्रोफाइल पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अश्विनच्या बॉलिंग स्टाइलबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. त्याला राइट आर्म ऑफ ब्रेक, राइट आर्म लेग ब्रेक बॉलर म्हटलं असून दोन्हीपुढे प्रश्नचिन्हही आहे. हा स्क्रीनशॉट अश्विनने ट्विटरवर पोस्ट केलाय.

ट्विटरवर अश्विनने म्हटलं की, आज सकाळी माझी कॉफी पिण्याची सुरुवात ही गोष्ट पाहत झाली. मला धक्का बसला की हे कुणी केलं? असं म्हणत अश्विनने हसणारे दोन इमोजी पोस्ट केले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतासाठी घरच्या मैदानावर खेळळी जाणारी ही मालिका महत्त्वाची आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी करावी लागेल. सध्या चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

First published:

Tags: Cricket, R Ashwin