मुंबई, 11 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 91 धावात गुंडाळलं. या विजयानंतर भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या विजयात रवींद्र जडेजाच्या खेळीचा मोठा वाटा होता. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात 70 धावा करून 7 विकेट्स देखील घेतल्या. परंतु या खेळीनंतर जडेजाला आयसीसीने एका प्रकरणात दोषी आढळले.
मागील बऱ्याच महिन्यांपासून दुखापत ग्रस्त असलेलया रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतून पुन्हा भारतीय संघात पदार्पण केले. या सामन्यात रवींद्र जडेजाने धडाकेबाज खेळी केली. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु भारताच्या विजयानंतर आयसीसीने जडेजाला दोषी आढळून दंड ठोठावला आहे.
हे ही वाचा : भर सामन्यात चाहता म्हणाला 'अन्ना भैय्या', अश्विनने ट्विट करत सुधारली चूक
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात गोलंदाजी करीत असताना 46व्या षटकात जडेजा त्याच्या बोटावर क्रीम लावताना दिसला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जडेजा सिराजच्या हातावर क्रीम घेत असताना आणि डाव्या बोटावर घासताना दिसत आहे, जडेजाने त्याच हातात बॉल पकडला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि मीडियाने त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. सामन्यादरम्यान हातावर कोणतीही क्रीम लावण्यासाठी मैदानी पंचाची परवानगी आवश्यक असली तरी भारतीय संघाने तसे केले नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाने माहिती दिली होती की फिंगर स्पिनर त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या सूजवर क्रीम लावत आहे. परंतु मैदानावरील पंचांची परवानगी न घेता ही कृती करण्यात आली. जडेजाने आपली चूक कबूल केली आणि आयसीसी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेला दंड मान्य केला.
जडेजाला या प्रकरणात एक डी-मेरिट पॉइंट मिळाला असून त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंडही भरावा लागणार आहे. रवींद्र जडेजा याने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.20 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Ravindra jadeja, Test cricket