मुंबई, 11 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यातील तिसरा दिवस आज पारपडला. तिसऱ्याच दिवशी भारताने 132 धावांनी कसोटीतील पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या निम्म्या संघाला तंबूत धाडले.
भारताच्या रोमहर्षक विजयात अश्विनच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा होता. परंतु याचवेळी भर मैदानात एका प्रेक्षकाने अश्विनला एका वेगळ्याच नावाने हाक मारली. प्रेक्षकाने मारलेली ही हाक अश्विनला खटकली आणि त्याने थेट ट्विट करत याकडे लक्ष वेधले.
रविचंद्रन अश्विन याला सामन्यादरम्यान एका चाहत्याने 'अन्ना भैया' अशी हाक मारली. यावर ट्विट करत अश्विनने लिहिले, "आज स्टेडियमवर कोणीतरी मला अण्णा भैया म्हटलं. अण्णा आणि भैया याचा अर्थ एकाच मोठा भाऊ असा होतो. मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी अत्यंत आभारी आहे पण ही एक छोटीशी दुरुस्ती मदत करेल."
Someone at the stadium called me Anna Bhaiya today. Anna and Bhaiya are one and the same ( big brother ) . I am extremely grateful for the love I receive but this one small correction would help
— Ashwin (@ashwinravi99) February 11, 2023
अश्विनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Nagpur, R Ashwin, Test series, Twitter