मुंबई, 11 फेब्रुवारी : नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याचा आज तिसरा दिवस असून यात फलंदाजी करताना भारताचा डाव 400 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या होत्या याच्या प्रत्युत्तरात भारताने 400 धावा करून सामन्यात 223 धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने दुसऱ्या दिवसा अखेरीस शतक झळकावले. रोहित 212 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकार ठोकत 120 धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या दोघांच्या 81 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाची कमान सांभाळली. परंतु दुसऱ्या दिवशी 66 धावा करणारा जडेजाला तिसऱ्या दिवशी केवळ 4 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलीयाचा खेळाडू टॉड मर्फीच्या चेंडूवर जडेजा क्लिम बोल्ड झाला. जडेजाने 185 चेंडूंत 9 चौकारांसह 70 धावा केल्या. हे ही वाचा : IND VS AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात होणार मोठे बदल! चांगली फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाचे टेंशन वाढवले. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षरसह 76 चेंडूंत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. परंतु मर्फीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शमीची विकेट पडली. शमीने 47 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 37 धावा केल्या तर अक्षर पटेल 174 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकारासह 84 धावांवर बाद झाला. भारताचा फलंदाजीचा डाव 400 धावांवर आटोपला असून भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.