मुंबई, 11 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या कसोटी सामन्यातील पहिला सामना सध्या नागपुरात खेळवला जात असून या सामन्यावर सध्या भारतीय संघाचे वर्चस्व आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील उर्वरीत तीन सामने भारताच्या विविध राज्यातील स्टेडियमवर खेळवले जाणार असून यापैकी तिसऱ्या सामन्याच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार असून तिसरी कसोटी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. परंतु याच्यापैकी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना हा धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. परंतु या स्टेडियमवर प्रत्यक्षात आऊटफिल्डचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. 12 फेब्रुवारीला बीसीसीआय या कामाची पाहणी करेल, त्यानंतर तिसऱ्या कसोटी मालिकेसाठी या स्थळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
रविवारी होणाऱ्या पाहणी दरम्यान जर तपासणी पथकाला मैदानाच्या कामात काही त्रुटी आढळल्यास हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसर्या कसोटी सामन्याचे यजमान हक्क गमावू शकतो. तेव्हा तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोहाली, पुणे, विशाखापट्टणम आणि बंगळुरू ही पर्यायी ठिकाणे मानली जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Test cricket