मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS AUS : पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

IND VS AUS : पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 132 धावांनी विजय मिळवला.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 132 धावांनी विजय मिळवला.

पहिल्या सामन्याचा आज तिसरा दिवस होता यात फलंदाजी करताना भारताने 400 धाव करत सामन्यात 223 धावांची आघाडी घेतली. परंतु भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अपयशी ठरला. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 132 धावांनी विजय मिळवला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 फेब्रुवारी : सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारताने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना 132 धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारताची या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात झाली आहे.

9 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलीयाचा हा निर्णय चुकीचा ठरवत अवघ्या 177 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना तंबूत पाठवले. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी रोहित शर्माच शतक, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच अर्धशतक तर शमीच्या धडाकेबाज खेळीच्या

जोरावर भारताने 400 धावा करून सामन्यावर मजबूत पकड बनवली. भारताने सामन्यात तिसऱ्या दिवशी 223 धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलिया संघा समोर तगडे आव्हान ठेवले.

तिसऱ्या दिवशी भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात आला परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत. भारताच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी धाडला, तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स तसेच अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. अवघ्या 91 धावांवर बाद होऊन ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला आणि भारताने तिसऱ्याच दिवशी पहिल्या सामन्यावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, R Ashwin, Ravindra jadeja