इंदौर, 03 मार्च : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताला दोन्ही डावात फक्त 109 आणि 163 धावाच करता आल्या. तर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 9 गडी राखून सामना जिंकला आणि यासोबतच त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी याचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे. गावस्कर म्हणाले की, फलंदाजांनी त्यांच्या प्रतिभेनुसार खेळ केला नाही. जर भारतीय फलंदाजांनी चुका करत विकेट गमावल्या. काही असे फटके खेळले की ज्यावरून वाटत होतं की त्यांनी आधीच अंदाज लावलेला की चेंडू कसा येईल? भारतीय फलंदाजांमध्ये आत्मविश्वास कमी दिसला, कारण रोहित शर्माशिवाय पहिल्या दोन सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत. रोहितने नागपूरमध्ये शतक केलं होतं. जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात तेव्हा फलंदाजांमध्ये थोडी अस्थिरता असते असंही गावस्कर म्हणाले. मेस्सीने ऑर्डर केले सोन्याचे 35 iPhone, वर्ल्ड चॅम्पियन्सना देणार गिफ्ट; वाचा काय आहे खास? दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत खेळपट्टीवरून अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन, मार्क वॉ, मायकल क्लार्क यांनी इंदौरच्या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसंच ही खेळपट्टी कसोटी खेळण्यासाठी नसल्याचं म्हटलं होतं. यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने चोख प्रत्युत्तर दिलं. रोहित शर्मा म्हणाला की, माजी क्रिकेटपटूंना या खेळपट्टीवर खेळावं लागलं नाही. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर आम्हाला खेळायचं होतं आणि ही आमची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही होम ग्राउंडवर खेळता तेव्हा तुमच्या क्षमतेनुसार खेळता. तुम्हाला फरक नाही पडत की बाहेरचे लोक काय म्हणतायत. जर आम्हाला रिजल्ट मिळाला नसता तर आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार केला असता. खेळपट्टीबाबत इतकं का बोलत आहेत हे मला कळत नाहीय. जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा फक्त खेळपट्टीवर लक्ष असतं. नाथन लायनची गोलंदाजी कशी होती? पुजाराची खेळी, उस्मान ख्वाजाने फलंदाजी कशी केली? या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकतो असंही रोहित शर्माने म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.