जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : अश्विनचा माइंड गेम, ऑस्ट्रेलियन फलंदाज वैतागला; हिटमॅनने काय केलं पाहा

VIDEO : अश्विनचा माइंड गेम, ऑस्ट्रेलियन फलंदाज वैतागला; हिटमॅनने काय केलं पाहा

R Ashwin

R Ashwin

ऑस्ट्रेलियन फलंदाज लॅब्युशेन अश्विनच्या गोलंदाजीवर अचनाक क्रीजवरून बाजूला झाला. यामुळे अश्विनला गोलंदाजी थांबवावी लागली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इंदौर, 03 मार्च : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक अशी राहिली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर फक्त ७५ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान तिसऱ्या दिवशी १ विकेट गमावत पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी जास्त वेळ खेळ झाला नाही. पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. यावेळी एक मजेशीर घटनाही घडली. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज लॅब्युशेन अश्विनच्या गोलंदाजीवर अचनाक क्रीजवरून बाजूला झाला. यामुळे अश्विनला गोलंदाजी थांबवावी लागली.

जाहिरात

IND Vs AUS : पराभवाला फलंदाज कारणीभूत, गावस्कर संतापले; तर रोहितही माजी क्रिकेटर्सवर भडकला   अश्विनच्या माइंड गेमला वैतागल्यानं चेंडू टाकण्याआधी लॅब्युशेन बाजूला झाला. तेव्हा अश्विन जिथे थांबला होता तिथूनच त्याने पुढचा चेंडू टाकला. अश्विनच्या अशा कृतीने ऑस्ट्रेलियन फलंदाजही चकीत झाला. दरम्यान, यात कर्णधार रोहित शर्माने पुढे येत पंचांशी चर्चा केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताला आता मालिका जिंकायची असेल तर चौथ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये होणारी चौथी कसोटी भारतासाठी महत्त्वाची आहे. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जबरदस्त पुनरागमन केलं असून २०१७ नंतर पहिल्यांदाच कसोटी जिंकण्यात त्यांना यश मिळालंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात