मुंबई, 23 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या आगामी 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श यांचे पुनरागमन झालं आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्चला होणार आहे. वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, एश्टर एगर, पॅट कमिन्स यांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. हे तिन्ही खेळाडू वेगवेगळ्या कारणांनी कसोटी मालिका अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियाला परतले आहेत. दुखापतीमुळे वॉर्नर कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे तर एश्टन एगरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कसोटी संघातून रिलीज कऱण्यात आलंय. दिल्ली कसोटी संपल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सही मायदेशी परतला.
हेही वाचा : ICC Ranking : अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये जडेजा अव्वल, टॉप 5 मध्ये भारताचे तिघे
मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही दुखापतीमुळे संघातून बाहेर होते. दोघांवरही काही दिवसांपूर्वी सर्जरी झाली होती. आता ते तंदुरुस्त असून एकदिवसीय मालिकेतून पुनरागमनासाठी सज्ज आहेत. यातला पहिला सामना 17 मार्चला मुंबईत होणार आहे तर दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणम इथं होईल. अखेरचा एकदिवसीय सामना 22 मार्चला चेन्नईत होणार आहे.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रेव्हिस हेड, जोश इंगलिस, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाए रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्ग, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.