जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS AUS : ऑस्ट्रेलिया संघ 197 वर ऑल आऊट, सामन्यात 88 धावांची आघाडी

IND VS AUS : ऑस्ट्रेलिया संघ 197 वर ऑल आऊट, सामन्यात 88 धावांची आघाडी

इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसऱ्या कसोटी सामना खेळला जात आहे.

इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसऱ्या कसोटी सामना खेळला जात आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस असून यात ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना 88 धावांची आघाडी घेतली आहे. आज भारताला ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज बाद करण्यात यश आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 मार्च : इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसऱ्या कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस असून यात ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना 88 धावांची आघाडी घेतली आहे. आज भारताला ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज बाद करण्यात यश आहे. बुधवारी भारताने नाणेफेक जिंकून तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ तग धरू शकला नाही. भारतीय संघ अवघ्या 109 धावा करून ऑल आउट  झाला होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर भारताला त्यांचे 4 फलंदाज बाद करण्यात यश आले. परंतु ऑस्ट्रेलियाने चांगली फलंदाजी करून दिवस अखेर 47 धावांची आघाडी मिळवली होती. IPL 2023 : मुंबई इंडिअन्सला मोठा दिलासा! बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या धाकडं गोलंदाजाला मिळणार संधी आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात उतरले. परंतु यावेळी भारताच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट घेऊन त्यांना ऑल आउट केले. यात रवींद्र जडेजाने काल 4 विकेट घेतल्या होत्या. तर आज आर अश्विन आणि उमेश यादव याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात