मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज या दोन संघांमध्ये मालिकेतील शेवटचा सामना चेन्नईच्या स्टेडियमवर पारपाडत असून प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 270 धावांचे आव्हान ठेवले आहे. परंतु हा सामना सुरु असताना भर मैदानात एक विचित्र प्रकार घडला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्याची नामुष्की ओढवली.
घडले असे की, ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करताना 43व्या षटकात कुलदीप यादव त्याच्या षटकातील तिसरा चेंडू टाकत होता. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या शॉन कुलदीपच्या चेंडूवर चौकार ठोकला. परंतु यानंतर एक कुत्रा स्टेडियमच्या आत येऊन थेट मैदानातच घुसला. या कुत्र्याला पाहून सर्वचजण काहीसे भांबावले. मैदानात मुक्त विहार करणाऱ्या या कुत्र्याला पकडण्यासाठी मैदानाचे कर्मचारी त्याच्या मागे धावत होते. अखेर काही वेळाने कुत्रा मैदानाबाहेर गेला.
Lots of noise at #Chepauk during the cricket match.
And, some naai-s too. A dog disrupts play at the #INDvsAUS match in #Chennai. pic.twitter.com/jtLRkZMYGj — Srinivasa Ramanujam (@srinivasjam) March 22, 2023
कुत्रा अचानक मैदानात आल्यामुळे हा सामना 10 मिनिट थांबवावा लागला. कुत्र्याला पकडण्यासाठी मैदानातील कर्मचारी प्रयत्न करत असताना कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि इतर खेळाडूंसह सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना त्यांचे हसू आवरले नाही.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma