मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS 3rd ODI : हार्दिक पांड्याचा ऑस्ट्रेलियाला धक्का! एका मागोमाग घेतले तीन विकेट

IND vs AUS 3rd ODI : हार्दिक पांड्याचा ऑस्ट्रेलियाला धक्का! एका मागोमाग घेतले तीन विकेट

हार्दिक पांड्याचा ऑस्ट्रेलियाला धक्का! एका मागोमाग घेतले तीन विकेट

हार्दिक पांड्याचा ऑस्ट्रेलियाला धक्का! एका मागोमाग घेतले तीन विकेट

चेन्नईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेण्यात यश आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. वनडे मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून तिसरा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका विजय मिळवू शकतात. चेन्नईच्या स्टेडियमवर मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात असून या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेण्यात यश आले आहे.

हार्दिक पांड्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 11 व्या शतकात पहिला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची धाव संख्या 68असताना हार्दिकने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली. हार्दिकने टाकलेल्या चेंडूवर कुलदीप यादवने ट्रॅव्हिस हेडचा झेल घेतला.  ट्रॅव्हिस हेडने पहिल्या विकेटसाठी मिचेल मार्शसोबत 68 धावांची भागीदारी केली होती. एवढ्यावरच न थांबता हार्दिकने 13 वे षटक सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याला शुन्यावर बाद केले.

ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

हार्दिक पांड्याने आपला हाच कायम कारनामा सुरु ठेऊन ऑस्ट्रेलीयासाठी 47 धावा करणाऱ्या मिचेल मार्श याला देखील बाद केले. 15 व्या शतकात हार्दिकने मिचेल मार्शच्या रूपात आपली तिसरी विकेट मिळवली. मिचेल मार्शला बोल्ड करण्यात हार्दिक पांड्या यशस्वी ठरला.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, India vs Australia