जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS AUS : भारतीय संघ संकटात! ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताचा निम्मा संघ तंबूत

IND VS AUS : भारतीय संघ संकटात! ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताचा निम्मा संघ तंबूत

भारतीय संघ संकटात! ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताचा निम्मा संघ तंबूत

भारतीय संघ संकटात! ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताचा निम्मा संघ तंबूत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना पारपडत असून आजच्या सामन्यात भारताची सुरुवात फार खराब झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना पारपडत असून आजच्या सामन्यात भारताची सुरुवात फार खराब झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरुवातीच्या 20 ओव्हरमध्ये भारताचे 4 खेळाडू बाद केले होते. तर आता भारताचा स्टार फलंदाज रवींद्र जाडेजा आणि विराट कोहलीला बाद करून ऑस्ट्रेलियाने भारताचा निम्मा संघ पुन्हा  तंबूत पाठवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 263 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला. परंतु सामना सुरु होताच 18 व्या षटकादरम्यान भारताचा उपकर्णधार के एल राहुल 41 चेंडूत अवघ्या 17 धावा करून बाद झाला. के एल राहुल नंतर मैदानात आपला 101 वा सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाऱ्याने कर्णधार रोहित शर्मा सोबत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हे ही वाचा  : RCB संघाची मोठी घोषणा! विराट कोहली नाही तर हा खेळाडू असणार संघाचा कर्णधार परंतु 20 वे षटक सुरु असताना नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक करणारा कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच पुढच्या चेंडूत ऑस्ट्रेलियाच्या घटक गोलंदाजांनी चेतेश्वर पुजाराची देखील विकेट घेतली. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या सामन्यात भारतासाठी एकही धाव करू शकला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

चेतेश्वर पुजारानंतर काही षटकांनंतर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर देखील 15 चेंडूवर अवघ्या 4 धावा करून बाद झाला. यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने विराट कोहलीच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 46 व्या षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रवींद्र जडेजाची विकेट घेतली. जडेजा 74 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. तर त्याच्या पाठोपाठ 50 व्या षटकात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विराटची देखील विकेट पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात