मुंबई, 17 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असून भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळत आहे. अशातच हा सामना पाहण्यासाठी खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी विशेष उपस्थिती लावली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी दुपारी 1:30 पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. भारतीय संघाने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली असून संघाने 30 ओव्हरमध्ये 185 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली असून शार्दूल ठाकूर वगळता भारताच्या 5 गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाची विकेट घेण्यात यश आले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला वनडे सामना पाहण्यासाठी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी विशेष उपस्थिती लावली. क्रिकेट असोसिएशनकडून रजनीकांत यांना या सामन्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. रजनीकांत यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia, Rajnikant, Superstar rajnikant, Wankhede stadium