मुंबई, 17 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला असून या सामन्यात के एल राहुलची खेळी भारतासाठी नवं संजीवनी ठरली. वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सामना पारपडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेलं 189 चं आव्हान भारताने 39.5 ओव्हरमध्ये 5 विकेट राखून पूर्ण केलं. भारताच्या हातून सामना निसटतोय असं वाटत असताना के एल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी भागीदारी करून भारताला विजयाच्या दिशेने पोहोचवलं. के एल राहुलने या सामन्यात 91 चेंडूत 75 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 69 चेंडूत 45 धावा केल्या.
सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्स गमावून 188 धावा करता आल्या. यात मोहम्मद शमी आणि सिराज या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, रवींद्र जडेजाला 2 विकेट तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या दोघांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ईशान किशन 3, विराट कोहली 4 आणि सूर्यकुमार यादव शून्य धावांवर बाद झाले. शुभमन गिल देखील अवघ्या 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या 25, के एल राहुल 75 आणि रवींद्र जडेजाने 45 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Kl rahul, Ravindra jadeja, Wankhede stadium