मुंबई, 15 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवला जात आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा हा दुसरा सामना असून या सामन्यात विजयासाठी भारताने वेस्ट इंडिज समोर 119 धावांच आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये हा सामना खेळवला जात असून या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीची उतरलेल्या भारतीय संघाने भारताने सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिज संघावर दबाव बनवला. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिला 3 तर पूजा वस्त्राकर पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंह हिला प्रत्येकी 1 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 118 धावा केल्या. हे ही वाचा : विराटचा स्वॅगच निराळा! चेतन शर्मानी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर कोहलीची पहिली पोस्ट ग्रुप स्टेज मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभव करून सामना जिंकलं होता. आता भारत पुन्हा एकदा दिलेल आव्हान पूर्ण करून दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवतो का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.