मुंबई, 15 फेब्रुवारी : मंगळवारी बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे केलेले स्टिंग ऑपरेशन जगासमोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक गोपनीय विषयांचा खुलासा केला आहे. फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात इथपासून ते विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील इगो प्रॉब्लेम अशा सर्वच गोपनीय गोष्टी चेतन यांनी उघड केल्या. यानंतर आता विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला 17 मार्च पासून सुरुवात होणार असल्याने भारतीय संघ दिल्ली येथे दाखल होत आहे. भारतच स्टार फलंदाज विराट कोहली देखील बऱ्याच काळानंतर दिल्ली येथील स्टेडियमवर पोहोचला. त्याने हॉटेलमधून स्टेडियमवर जात असताना एक फोटो स्टोरीवर शेअर केला.
विराटने त्याचा एक कूल फोटो शेअर करत म्हंटले, “खूप दिवसांनी दिल्लीतील स्टेडियमकडे जाण्यासाठी प्रवास करतोय. नॉस्टॅल्जिक फीलिंग” या फोटोत विराटचा स्वॅग आणि सुपर कुल अंदाज पहायला मिळत आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या मोठ्या खुलाशानंतर त्यांची लवकरच बीसीसीआय तर्फे पदावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. यापूर्वी देखील चेतन शर्मा यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले होते. तेव्हा कोहलीने ‘कर्मा’ विषयी केलेली पोस्ट फार चर्चेत आली होती. खरंतर आता चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन आणि विराट कोहलीने केलेली पोस्ट याचा काही संबंध नसला तरी सोशल मीडियावर विराटाचे फॅन्स या आशयाचे फोटो पोस्ट करीत आहेत.