जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS ENG : आज महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारत इंग्लंडशी भिडणार

IND VS ENG : आज महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारत इंग्लंडशी भिडणार

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघ  इंग्लंडच्या संघाशी भिडणार आहे. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघ इंग्लंडच्या संघाशी भिडणार आहे. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघ इंग्लंडच्या संघाशी भिडणार आहे. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघ  इंग्लंडच्या संघाशी भिडणार आहे. आज या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असून यापूर्वी भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तर इंग्लंडने देखील आयर्लंड सोबतच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला होता. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यातील ग्रुप B मध्ये इंग्लंड, आयर्लंड, वेस्टइंडीज सह भारत आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. वेस्ट इंडिजला नमवून वर्ल्ड कपमध्ये दमदार आगेकूच केलेल्या भारताला स्पर्धेतील आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे. तेव्हा आवश्यकतेनुसार भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. हे ही वाचा : विराट कोहलीची RCB संघाबाबत मोठी घोषणा कधी होणार सामना : आज 18 फेब्रुवारी रोजी भारत इंग्लंड यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ग्रुप स्टेजचा सामना रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर  मध्ये होणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.

News18लोकमत
News18लोकमत

कुठे पाहाल सामना : भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हा सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील. भारताचा टी 20 महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्‍वरी गायकवाड.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात