मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Under 19 WC : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची दमदार सुरुवात! इंग्लंडचे 6 फलंदाज बाद

Under 19 WC : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची दमदार सुरुवात! इंग्लंडचे 6 फलंदाज बाद

पहिल्यांदाच आयसीसीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय महिला क्रिकेट संघ हा वर्ल्ड कप जिंकून नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची दमदार सुरुवात झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिका येथे खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारत आणि इंग्लंडचे महिला संघ आमने सामने आले आहेत. पहिल्यांदाच आयसीसीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय महिला क्रिकेट संघ हा वर्ल्ड कप जिंकून नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची दमदार सुरुवात झाली असून भारताने नाणेफेक जिंकत पहिल्या काही ओव्हरमध्येच इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले आहे.

आयसीसी अंडर 19 महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या Senwes park , Potchefstroom येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीला झालेली नाणेफेक भारतीय संघाने जिंकली. नाणेफेक जिंकत त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शेफाली वर्माचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी अतिशय खरा ठरवला.

हे ही वाचा  : ऑस्ट्रेलियन ओपनमधून परतलेल्या सानियाचं कुटुंबाकडून जल्लोषात स्वागत, पहा व्हिडीओ

सामन्याला सुरुवात होताच काही वेळात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे एक एक फलंदाज बाद झाले. भारताची गोलंदाज तितास साधू, पार्श्वि चोप्रा आणि  अर्चना देवी यांनी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 6 फलंदाजांची विकेट घेऊन सामन्याची दमदार सुरुवात केली. तितास साधू, पार्श्वि चोप्रा आणि  अर्चना देवी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Indian women's team, T20 cricket