जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑस्ट्रेलियन ओपनमधून परतलेल्या सानियाचं कुटुंबाकडून जल्लोषात स्वागत, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियन ओपनमधून परतलेल्या सानियाचं कुटुंबाकडून जल्लोषात स्वागत, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियन ओपनमधून परतलेल्या सानियाचं कुटुंबाकडून जल्लोषात स्वागत, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियन ओपन खेळून सानिया मिर्झा पुन्हा तिच्या दुबई येथील घरी परतली. यावेळी तिच्या कुटुंबाने तिला मोठे सरप्राईज दिले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 जानेवारी :  भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने तिच्या करिअरमध्ये सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक स्पर्धांमध्ये पदकांवर नाव कोरलं.  भारताची ही टेनिस क्वीन नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या मिश्र दुहेरी स्पर्धेत सहभागी झाली होती. परंतु मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ती पराभूत झाली. टेनिस करिअरमधला हा तिचा शेवटचा ग्रँडस्लॅम सामना होता. हे ही वाचा : शोएब अख्तर मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा! किडनॅपिंगचा ही केला होता प्लॅन ऑस्ट्रेलियन ओपन खेळून सानिया मिर्झा पुन्हा तिच्या दुबई येथील घरी परतली. यावेळी तिच्या कुटुंबाने तिला मोठे सरप्राईज दिले. सानियाचे  कुटुंब आणि मित्रमंडळींनी तिचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सानियाचे घर सजवण्यात आले होते.

जाहिरात

सानियाने याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कुटुंबाकडून मिळालेले सरप्राईज पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला होता.

सानिया मिर्झाच्या निवृत्तीनंतर तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने ट्विट करून तिचे कौतुक केले. सानिया आणि शोएब मलिक यांच्यात  घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना शोएबच्या या ट्विटनंतर या दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात