मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सांगलीच्या स्मृतीने वाचवली टीम इंडियाची लाज, ICC T20 Team मध्ये एकमेव भारतीय

सांगलीच्या स्मृतीने वाचवली टीम इंडियाची लाज, ICC T20 Team मध्ये एकमेव भारतीय

भारताची स्टार ओपनिंग बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) बुधवारी देशाची लाज वाचवली आहे. 2021 सालच्या टी-20 टीमची आयसीसीने (ICC Women T20I Team of the Year) घोषणा केली. या टीममध्ये स्मृती मंधाना एकमेव भारतीय आहे.

भारताची स्टार ओपनिंग बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) बुधवारी देशाची लाज वाचवली आहे. 2021 सालच्या टी-20 टीमची आयसीसीने (ICC Women T20I Team of the Year) घोषणा केली. या टीममध्ये स्मृती मंधाना एकमेव भारतीय आहे.

भारताची स्टार ओपनिंग बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) बुधवारी देशाची लाज वाचवली आहे. 2021 सालच्या टी-20 टीमची आयसीसीने (ICC Women T20I Team of the Year) घोषणा केली. या टीममध्ये स्मृती मंधाना एकमेव भारतीय आहे.

दुबई, 19 जानेवारी : भारताची स्टार ओपनिंग बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) बुधवारी देशाची लाज वाचवली आहे. 2021 सालच्या टी-20 टीमची आयसीसीने (ICC Women T20I Team of the Year) घोषणा केली. या टीममध्ये स्मृती मंधाना एकमेव भारतीय आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुषांच्या टीममध्ये तर एकाही भारतीयचा समावेश नाही. टी-20 मध्ये भारतीय टीमची उपकर्णधार असणाऱ्या डावखुऱ्या स्मृतीने 2021 साली 31.87 च्या सरासरीने 255 रन केले. मागच्या वर्षी स्मृती टी-20 मध्ये भारताची सर्वाधिक रन करणारी खेळाडू ठरली.

25 वर्षांच्य स्मृतीने 9 मॅचमध्ये 2 अर्धशतकं केली, यात तिचा स्ट्राईक रेट 131.44 चा होता. स्मृती मंधाना आयसीसीच्या टीममधली एकमेव भारतीय महिला आहे. इंग्लंडच्या बऱ्याच खेळाडूंचा या टीममध्ये समावेश आहे. नॅट स्किवरला टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. स्किवरने 2021 मध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 153 रन केले आणि 20.20 च्या सरासरीने 10 विकेटही पटकावल्या.

स्मृती मंधानासोबत इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंटला ओपनिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टॅमीने 9 मॅचमध्ये 3 अर्धशतकांसह 33.66 च्या सरासरीने 303 रन केले. टॅमीसोबतच टीममध्ये डॅनी वॅट, विकेट कीपर एमी जोन्स आणि स्पिनर सोफी एकलेस्टोन या इंग्लंडच्या खेळाडू आहेत. आयर्लंडची गॅबी लुईस, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवार्ट, शब्निम इस्माईल आणि मारिजेन कॅप, तसंच झिम्बाब्वेची लॉरिन फिरी यांना संधी देण्यात आली आहे.

आयसीसीने 2021 च्या सर्वोत्तम पुरुष टी-20 टीमचीही घोषणा केली आहे. यात पाकिस्तानचे तीन खेळाडू आहे. बाबर आझमला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. याशिवाय मोहम्मद रिझवान आणि शाहिन आफ्रिदीदेखील या टीममध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकवणारे मिचेल मार्श आणि फास्ट बॉलर जॉश हेजलवूडही टीममध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेचे एडन मार्करम, डेव्हिड मिलर आणि तबरेज शम्सी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

महिला टी-20 टीम

स्मृती मंधाना, टॅमी ब्युमोंट, डॅनी वॅट, गॅबी लुईस, नॅट स्किवर (कर्णधार), एमी जोन्स, लॉरा वूलवार्ट, मारिजेन कॅप, सोफी एकलेस्टोन, लॉरिन फिरी, शब्निम इस्माइल

पुरुष टी-20 टीम

जॉस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आजम (कर्णधार), एडेन मार्करम, मिचेल मार्श, डेविड मिलर, तबरेज शम्सी, जॉस हेजलवूड, वानिंदु हसरंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहिन आफ्रिदी

First published:

Tags: Icc, Smruti mandhana, T20 cricket, Team india