• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 Worldcup स्पर्धेत INDvsPAK सामना रद्द करण्याच्या मागणीवर BCCI चे मोठे विधान

T20 Worldcup स्पर्धेत INDvsPAK सामना रद्द करण्याच्या मागणीवर BCCI चे मोठे विधान

 INDvsPAK सामना रद्द करण्याच्या मागणीवर BCCI ने केले मोठे विधान

INDvsPAK सामना रद्द करण्याच्या मागणीवर BCCI ने केले मोठे विधान

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर(Jammu And Kashmir) येथे दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने टी-20 वर्ल्ड (T20 Worldcup) कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये या मागणीने जोर धरला आहे. या मागणीवर बीसीसीआयने आपले मत स्पष्ट केले आहे.

 • Share this:
  दुबई, 18 ऑक्टोबर : मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर(Jammu And Kashmir) येथे दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने टी-20 वर्ल्ड (T20 Worldcup) कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये या मागणीने जोर धरला आहे. या मागणीला काही राजकीय नेत्यांनीदेखीला पाठिंबा दिला आहे. यासर्वांची गंभीर दखल घेत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( Rajeev Shukla) यांनी टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने नागरिकांना लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या, विशेषत: बाहेरच्या राज्यांतून आलेल्या लोकांना मारले जात आहे. ज्यामध्ये बिहारमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. या हत्याकांडानंतर लोकांचा पाकिस्तानविरुद्धचा राग आणखी वाढला आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरला टीम इंडियाचा होणारा पाकिस्तानसोबतचा सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, बीसीसीआयने या मागणीर आपले मत व्यक्त केले आहे. ''सामना रद्द केला जाऊ शकत नाही असे स्पष्ट करत “काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जो भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील,” असे ठाम मत शुक्ला यांनी यावेळी व्यक्त केले. गिरीराज सिंह यांच्या व्यतिरिक्त, बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवण्याची मागणी केली आहे.

  बीसीसीआय भारत-पाक सामना का रद्द करू शकत नाही?

  आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसीचा सदस्य देश राजकीय कारणास्तव दुसऱ्या सदस्य देशाशी सामना खेळण्यास नकार देऊ शकत नाही. हा सामना खेळण्यास नकार दिल्याबद्दल भारताला मोठा दंड होऊ शकतो. 2003 आणि 1996 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचे सामने खेळण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला होता. जर भारताने सामना खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तानला विजयी घोषित केले जाईल आणि भारतीय संघ सामना न खेळता हरेल.आयसीसीला ही भारत-पाकिस्तान सामन्यातून बराच आर्थिक फायदा होणार आहे आणि त्यामुळे तेही हा सामना रद्द करू शकत नाहीत. या एका सामन्यानं स्पर्धेच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.
  Published by:Dhanshri Otari
  First published: