मुंबई, 12 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूजीलंडने भारताला दणका देत, वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर केले. भारताचे आघाडीची आणि मधली फळी अयशस्वी झाल्यानंतर जडेजा आणि धोनीनं भारताचा खेळ सावरला. मात्र यात विराट कोहलीच्या कर्णधारपदावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले. त्यात धोनीला तळाला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय अनेकांना खटकला. दरम्यान, भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर सध्या विश्रांती घेत असले तरी, ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला विराट ऐवजी रोहित शर्माकडे भारतीय संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने पाच अर्धशतके लगावली मात्र पहिल्यांदाच त्याला ICC स्पर्धेत शतक करता आले नाही. दुसरीकडे रोहित शर्माने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तुफानी खेळी करत पाच शतक लागवले. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 648 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूजीलँड विरोधात मात्र रोहित केवळ एक धाव करत बाद झाला. तसेच विराट कोहली गेल्या वर्षभरापासून सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे दिले जाऊ शकते. भारताचा वेस्ट इंडिज दौरा वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ लगेचच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. सात आठवडे इंग्लंडमध्ये घालवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. त्यानंतर 1 ऑगस्टला वेस्ट इंडिजकरीता रवाना होऊ शकतो. वेस्ट इंडिज विरोधात भारताचे 3 टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. या खेळाडूंना मिळू शकते विश्रांती 2019मध्ये भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड दौऱ्यानंतर आयपीएलमध्ये भारतीय संघ व्यस्त होता, त्यांनतर वर्ल्ड कप. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे या मुख्य खेळाडूंना विश्रांती मिळू शकते. लवकरच मिळणार शास्त्री गुरुजींना नारळ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर शास्त्रींची हकालपट्टी केली जाऊ शकते. कर्णधार विराट कोहली शास्त्रींचे कौतुक करत असले तरी, बीसीसीआयचे अधिकारी मात्र शास्त्रींवर नाराज आहेत. SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.