मँचेस्टर, 15 जून: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील 22वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना गमवलेला नाही. पण याच पाकिस्तानच्या संघाने चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला कमी लेखण विराटसेनेसाठी धोक्याचे ठरेल. मँचेस्टर पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे या सामन्यात देखील पावसाचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पण असे असले तरी हा सामना रद्द होणार नाही. ढगाळ वातावरणात पाकिस्तानचे गोलंदाज भारतीय संघातील फलंदाजांना त्रास देऊ शकतील. मोहम्मद आमिर, वहाब रियाझ हे गोलंदाज भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही फलंदाज टॉप फॉर्ममध्ये आहेत आणि जेव्हा या दोघांची बॅट चालते तेव्हा गोलंदाजांचे काही चालत नाही. पाऊस पडला तरी काळजी नको ! फायदा तर टीम इंडियालाच होणार वर्ल्डकपमधील या हायव्होल्टेज सामना कुठे आणि कसा पाहायचा यासाठी सर्वांनी प्लॅन केले असतील. काही जण घरी कुटुंबासोबत, काही जण मित्रांसोबत हा सामना पाहणार असतील. टिव्ही शिवाय तुम्ही हा सामना अन्य ठिकाणी देखील पाहू शकता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मँचेस्टर येथील मैदानावर होणारा हा सामना तुम्ही लाईव्ह स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर इंग्रजी, हिंदी आणि HDवर पाहू शकता. Online पाहण्यासाठी… वर्ल्डकपमधील हा सामना तुम्ही हॉटस्टार(Hotstar)वर लाईव्ह पाहू शकता. केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नव्हे तर अन्य सर्व सामने तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.