नवी दिल्ली, 31 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. प्रत्येक चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतोच असं ट्वीट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर त्याने आपले मनमोकळे करण्याच प्रयत्न केला आहे. यादरम्यान, त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni ) संदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
इंडिया टी व्हीशी संवाद साधताना भज्जीने मनातील सर्व भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याने 2011 च्या विश्वविजेत्या संघातील एक किस्सा सांगितला. यावेळी त्याने धोनीवर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केली.
2011 च्या विश्वविजेत्या संघात भज्जीला स्थान देण्यात आले नव्हते. भारताकडून केवळ 10 वनडे आणि 10 टेस्ट सामने खेळले असून सुद्धा संघातून का वगळण्यात आले. असा सवाल त्याला केला असता त्याने मौन सोडले.
तो म्हणाला,400 विकेट घेणाऱ्या व्यक्ती कसे काय संघातून आऊट केले जाऊ शकते ही एक गोष्ट रहस्यमय आहे. जी अद्याप समोर आलेली नाही. मला अजूनही आश्चर्य वाटते. नेमकं काय झालं होत? मी संघात असल्याने कोणाला अडचण होती? असे सवाल त्याने यावेळी उपस्थित केले.
आणि तो म्हणाला, मला संघाबाहेर का काढण्यात आलंय याबद्दल मी महेंद्रसिंग धोनीला विचारले. अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला. मला धोनीने कधीही संघातून वगळण्याचं कारण दिलं नाही. त्यामुळे मग माझं मलाच समजलं की आता पुन्हा पुन्हा असा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही", अशी भावना यावेळी भज्जीने व्यक्त केली.
तुमच्याबाबतीत जेव्हा अचानक एखादा निर्णय घेतला जातो, आणि त्यामागचं कारण काय? त्यामागे कोणाचा हात आहे? हे प्रश्न विचारूनही जर तुम्हाला त्याची उत्तरं मिळत नसतील तर तो विषय तिथेच सोडून द्यावा. असे सूचक वक्तव्यदेखील भज्जीने यावेळी केले.
हरभजन ने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट घेतल्या आहेत. वनडे मॅचमध्ये 269 बळ टिपले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Harbhajan singh, MS Dhoni