मुंबई, 16 एप्रिल : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची (Harbhajan Singh) आम आदमी पक्षानं (Aaam Aadmi Party) राज्यसभा खासदार म्हणून निवड केली आहे. पंजाब राज्यात ‘आप’ चं सरकार येताच त्यांनी हरभजनच्या निवडीची घोषणा केली. दोन दशकांपेक्षा जास्त क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या हरभजननं राजकीय मैदानातही दमदार एन्ट्री केली आहे. हरभजननं राज्यसभा खासदार म्हणून मिळणारा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुलीचे शिक्षणासाठी देण्याची घोषणा केली आहे. हरभजननं स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘एक राज्यसभा सदस्य म्हणून शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी मी मला मिळणाऱ्या पगारातून हातभार लावणार आहे. मी देश चांगला करण्याच्या मोहिमेत सहभागी झालो असून यासाठी जे काही करता येईल ते करणार आहे.’ असं हरभजननं जाहीर केलंय.
As a Rajya Sabha member, I want to contribute my RS salary to the daughters of farmers for their education & welfare. I've joined to contribute to the betterment of our nation and will do everything I can. Jai Hind 🇮🇳🇮🇳
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 16, 2022
भगवंत मान आणि हरभजन सिंग जवळचे मित्र आहेत. पंजाबमध्ये आपचा विजय झाला तेव्हा हरभजन सिंगने ट्वीट करून भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आपचं अभिनंदन मुख्यमंत्री होणाऱ्या माझ्या मित्राला भगवंत मानला शुभेच्छा, असं ट्वीट हरभजनने केलं होतं. By-Poll Results 2022: देशभरात BJP ला धक्का, RJD-TMC ची मोठी आघाडी; काँग्रेसही पुढे दिल्लीनंतर सत्ता येणारं पंजाब हे आपचं दुसरं राज्य आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागांवर आपचा विजय झाला. आप उमेदवारांनी पंजाबच्या दिग्गजांना धूळ चारली. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवरून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धूही आप उमेदवारासमोर पराभूत झाले. हरभजननं गेल्या वर्षी 24 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती.