Home /News /national /

By-Poll Results 2022: देशभरात BJP ला धक्का, RJD-TMC ची मोठी आघाडी; काँग्रेसही पुढे

By-Poll Results 2022: देशभरात BJP ला धक्का, RJD-TMC ची मोठी आघाडी; काँग्रेसही पुढे

By-Poll Results 2022: देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांसाठी (Lok Sabha and four Assembly seats) 12 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल: देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांसाठी (Lok Sabha and four Assembly seats) 12 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. पश्चिम बंगालमधील (West Bengal) एक लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेसाठी, तर महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगड विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. (Maharashtra, Bihar and Chhattisgarh Assembly seats) देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एका लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेवर आघाडीवर आहे. शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा जागेसाठी टीएमसीचे उमेदवार आहेत. तर बाबुल सुप्रियो येथील बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेचे निकालही आज येत आहेत. या जागांसाठी 12 एप्रिल रोजी मतदान झाले होते. कोल्हापुरात 14व्या फेरीनंतर काँग्रेसच्या उमेदवार 12 हजार 266 मतांनी आघाडीवर कोल्हापुरात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव 14व्या फेरीच्या मतमोजणीत 12 हजार 266 मतांनी आघाडीवर आहेत. 14व्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री यांना 3 हजार 756 तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 2 हजार 669 मते मिळाली. आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा इतर उमेदवारांपेक्षा 91 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पश्चिम बंगाल: बल्लीगंगेमध्ये 10व्या फेरीनंतर बाबुल 7872 मतांनी आघाडीवर बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो 7872 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या 10व्या फेरीनंतर बाबुल सुप्रियो यांना 28 हजार 635, सीपीआयएमच्या उमेदवाराला 20 हजार 763 मते, काँग्रेसच्या उमेदवाराला 4 हजार 092 आणि भाजपच्या उमेदवाराला 3 हजार 621 मते मिळाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Election, RJD, TMC, Young Congress

    पुढील बातम्या