Home /News /sport /

‘कोहली भज्जीची दुसरी आई’ Viral होतेय पोस्ट, नेमकं काय आहे प्रकरण?

‘कोहली भज्जीची दुसरी आई’ Viral होतेय पोस्ट, नेमकं काय आहे प्रकरण?

virat kohli

virat kohli

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने(Harbhajan Singh) विराट कोहलीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एक गंमतीशीर किस्सा बनला आहे.

    नवी दिल्ली, 31 डिसेंबर: टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहलीने(Virat Kohli) 5 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र, त्याच्या वाढदिवसाचा एक मजेशीर किस्सा व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही(Harbhajan Singh) त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्याच्या शुभेच्छा एक गंमतीशीर किस्सा बनला आहे. विराटच्या वाढदिवसानिमित्त भज्जीने ट्विट करत विराटचा उल्लेख माझ्या सख्या भावासारखा असा केला. मात्र, त्याचे हे ट्विट छापताना एका हिंदी वृत्तपत्रीकेची गडबड झाली असल्याचे पाहायला मिळाले. भज्जीने दिलेल्या शुभेच्छांची बातमी छापताना, “भज्जी ने कोहली तो दुसरी माँ कहा” ज्याचा अनुवाद “हरभजन सिंग विराट कोहलीला दुसरी आई म्हणतो.” असा गंमतीशीर मथळा छापला आहे .सध्या ही पोस्ट व्हायरल होत असून स्वतः भज्जीने हा किस्सा ट्विट केला आहे. आणि हस्स्याच्या इमोजीस शेअर केल्या आहेत. भज्जीच्या या ट्विटवर अनेक युजर्स मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. नेमकं भज्जीने काय केलं होत ट्विट? वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट कोहली. माझ्या सख्या भावासारखा आहेस. नेहमी खूश राहा असे ट्विट भज्जीने केले होते. काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. प्रत्येक चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतोच असं ट्वीट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Harbhajan singh, Virat kohli

    पुढील बातम्या