जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'मला कोणाचे तळवे चाटायचे नाहीत'.. निवृत्तीनंतर Harbhajan Singh चे मोठे वक्तव्य

'मला कोणाचे तळवे चाटायचे नाहीत'.. निवृत्तीनंतर Harbhajan Singh चे मोठे वक्तव्य

Harbhajan Singh

Harbhajan Singh

भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. तशी घोषणाच हरभजन सिंहनं ट्विटरच्या माध्यमातून दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 जानेवारी: भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. तशी घोषणाच हरभजन सिंहनं ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्याच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतात अनेक त्याच्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तो राजकारणात प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, भज्जी नेमकं काय करणार आहे, याचा खुलासा त्याने केलेला नाही. एका न्यूज चॅनेलशी त्याने संवाद साधला असता त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. निवृत्तीनंतर असे अनेक खेळाडू आहेत जे बीसीसीआय आणि बोर्डाच्या विरोधात उभारत नाहीत, तसेच, भविष्याबद्दल विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, मी असा एक व्यक्ती आहे, जे चुकच असेल ते चुकीच म्हणणार. मला वाटते की जो कोणी प्रामाणिक माणसाची काळजी करतो तो मला नक्कीच सांगेल की तू येऊन हे काम कर, तू ते करू शकतोस. मला कोणाचे तळवे चाटायचे नाहीत की मला विशेष काम दिले जावे. मग ते कोणत्याही क्रिकेट असोसिएशनचे काम असो वा कोणत्याही प्रकारे. कष्ट करून मी आयुष्यात प्रगती केली आहे. देवाने माझ्यात इतके गुण दिले आहेत की मी काही केले तर त्यात यश मिळवता येते.

3-4 वर्षापूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती41 वर्षीय

हरभजनने निवृत्तीसंदर्भातही भाष्य केले. तो म्हणाला, 3-4 वर्षापूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. मला खूप वेळ झाला आहे. या रस्त्यावर मी खूप वेळाने पोहोचलो. वेळ बरोबर नव्हती. वर्षाच्या अखेरीस विचार आला की, ‘क्रिकेटची अन्य कोणत्या तरी पद्धतीने सेवा करायची, आता खेळण्याची इच्छा पूर्वीसारखी राहिली नाही. 41 व्या वर्षी एवढी मेहनत करावीशी वाटत नाही, विचार केला की आयपीएल खेळायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल, आता भविष्यात खेळाची सेवा कशी करेन ते पाहायचे आहे.’ अशी भावना वर्षीय हरभजनने निवृत्तीसंदर्भात व्यक्त केली.

भज्जीला मैदानातून निवृत्ती घ्यायची होती

‘प्रत्येक खेळाडूचा भारताच्या जर्सीमध्ये निवृत्ती घेण्याचा विचार असतो, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही. अनेकवेळा असे होत नाही, वीरेंद्र सेहवाग किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण हे सर्वांसोबत करू शकले नाहीत, मागे वळून पाहिले तर बीसीसीआयने त्यांना निवृत्तीसाठी एक सामना दिला असता तर त्यांची इच्छा पूर्ण झाली असती. त्याने भारतीय क्रिकेटला 10-15 वर्षे दिली, पण तसे झाले नाही तरी त्याचा अभिमान कमी होणार नाही. तो मोठा खेळाडू होता, त्याचे काम मोठे आहे, त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात