मुंबई, 14 मे : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) 200 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. टीम इंडियाचा माजी बॅट्समन मनोज तिवारी (Manoj Tiwary) हा या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून विजयी झाला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या तिवारीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी क्रीडा मंत्री बनवलं आहे. तिवारीनं नुकताच त्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं तिवारीचं अभिनंदन करताना एक कडवट गोष्ट सांगितली. हरभजननं तिवारीचं अभिनंदन करताना ट्विट केलं, ‘अभिनंदन मनोज तिवारी. तुझ्या करियरच्या बाबतीत जे झालं ते कोणत्याही मुलाच्या बाबतीत घडू देऊ नकोस. देवानं तुझ्यावर कृपा करावी. शुभेच्छा.’ हरभजनला या ट्विट केल्यानंतर यावर वाद होऊ शकतो याची कल्पना आली असेल, त्यामुळे त्यानं काही वेळातच ट्विट डिलिट केले.
काय घडले होते? बंगाल क्रिकेटमध्ये ‘छोटा दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज तिवारीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर रन केले. मात्र त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द तितकी यशस्वी ठरली नाही. त्याला राष्ट्रीय टीममध्ये निवडल्यानंतर दुखापतीमुळे टीमच्या बाहेर बसावं लागलं. भारतीयांवर जळणाऱ्या माजी कॅप्टनचा विल्यमसनच्या खांद्यांवरुन कोहलीवर निशाणा तिवारीनं 20111 साली वेस्ट इंडिज विरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या वन-डे मध्ये शतक झळकावलं. पण या शतकानंतरही त्याला सात महिने टीमच्या बाहेर होता. सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये तिवारीला फक्त 12 वन-डे आणि 3 टी 20 मॅचमध्ये संधी मिळाली. त्याच्या या करियरचा संदर्भ देऊनच हरभजननं हे ट्विट केलं असावं असा अंदाज आहे. हरभजननं हे ट्विट डिलिट केलं असलं तरी त्याचा स्क्रीन शॉट् चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.