मुंबई, 7 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि साक्षी धोनी (Sakshi Dhoni) यांच्या लग्नाला 4 जुलै रोजी 11 वर्ष पूर्ण झाली. तर आज धोनीचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी धोनी कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन साक्षीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साक्षीनं धोनीचे अनेक रहस्य सांगितले आहेत.
'कुणावरही न रागवणारा धोनी माझ्यावर रागवतो. जगातील मी एकमेव व्यक्ती आहे, जिच्यावर तो चिडतो. कारण मी त्याच्या सर्वात जवळ आहे,' असे साक्षीने यावेळी सांगितले. त्यानंतर साक्षीने माहीच्या व्हिडीओ गेमच्या वेडाबद्दल माहिती दिली. 'धोनी सतत विचार करत असतो, व्हिडीओ गेम खेळताना त्याचे मन एका कामात गुंतलेले असते, त्यामुळे त्याच्या या सवयीचा मला राग येत नाही.
त्याला Call Of Duty आणि PUBG हे खेळ आवडतात. PUBG नं तर सध्या माझ्या बेडरुममध्ये शिरकाव केला आहे. तो माझ्याशी बोलत आहे, असं मला वाटतं पण प्रत्यक्षात हेडफोन लावून हा गेम खेळणाऱ्या इतरांशी बोलत असतो. इतकंच नाही तर झोपेतही माही PUBG बद्दल बोलतो,' असा खुलासा साक्षीनं केला.
King Queen! Some cute little #Yellove ly moments to make the day more special! #WhistlePodu @msdhoni @SaakshiSRawat pic.twitter.com/AqUtIEeJ8G
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) July 4, 2021
धोनीने साक्षीला दिले स्पेशल गिफ्ट
महेंद्रसिंह धोनीनं साक्षीला लग्नाच्या वाढदिवसानिमत्त एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त साक्षीला एक गाडी दिली आहे. फॉक्सवॅगन बीटल ही विंटेज कार धोनीने पत्नीला दिली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या या गिफ्टबद्दल धन्यवाद, असं कॅप्शन साक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीला दिलं आहे. 4 जुलै 2010 साली धोनीने साक्षीसोबत लग्न केलं. त्याआधी एक दिवस देहरादूनमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.
रमेश पोवारचं मिताली राजबद्दल बदललं मत, इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरीबद्दल म्हणाला..
धोनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा मैदानात दिसेल. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचं आयोजन युएईमध्ये होणार आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करतो. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 29 मॅचनंतर अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, MS Dhoni, Sakshi dhoni, Video, Wedding, Wedding anniversary