मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday Sachin: सचिनचं पहिल्यांदा पेपरमध्ये नाव कसं आलं? वाचा 'मास्टर ब्लास्टर'च्या आयुष्यातील 'तो' किस्सा

Happy Birthday Sachin: सचिनचं पहिल्यांदा पेपरमध्ये नाव कसं आलं? वाचा 'मास्टर ब्लास्टर'च्या आयुष्यातील 'तो' किस्सा

सचिनचं आयुष्य एखाद्या खुल्या पुस्तकासारखं आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यातले काही किस्से असे आहेत, की जे फारच थोड्या लोकांना माहिती आहेत.

सचिनचं आयुष्य एखाद्या खुल्या पुस्तकासारखं आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यातले काही किस्से असे आहेत, की जे फारच थोड्या लोकांना माहिती आहेत.

सचिनचं आयुष्य एखाद्या खुल्या पुस्तकासारखं आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यातले काही किस्से असे आहेत, की जे फारच थोड्या लोकांना माहिती आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 एप्रिल : क्रिकेटचा देव मानला जाणारा दिग्गज आणि विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू (Cricketier) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज (24 एप्रिल) 48 वर्षांचा झाला आहे. आपल्या दीर्घ आणि उज्ज्वल कारकिर्दीतून तो 2014 साली निवृत्त झाला असला, तरी त्याचं कर्तृत्व, त्याची उपस्थिती आजही उत्साह देते. सचिनचं आयुष्य एखाद्या खुल्या पुस्तकासारखं आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यातले काही किस्से असे आहेत, की जे फारच थोड्या लोकांना माहिती आहेत.

देवावर दृढ विश्वास

2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू असलेल्या मॅचमध्ये टीम इंडिया विजयाच्या मार्गावर होती, तेव्हा सचिन तेंडुलकर डोळे बंद करून मनोमन देवाची प्रार्थना करत होता. भारतीय टीमच्या विजयासाठी त्याने आपली दाढीही वाढवली होती. टीमचा विजय झाल्यानंतर त्याने दादरच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दाढी केली. सचिनला जवळून ओळखणाऱ्या सर्वांनाच तो खूपच धार्मिक असल्याचं माहित आहे. त्याचा देवावर दृढ विश्वास आहे. पूजा-अर्चाही तो रोज करतो. आशिया कप स्पर्धेत त्याने 100वं शतक फटकावलं आणि त्यानंतर तो घरी आला, तेव्हा गुढीपाडव्या दिवशी त्याने विनायकाचं कुटुंबियांसह दर्शन घेतलं होतं.

पहिल्यांदा पेपरमध्ये नाव कसं आलं?

नंतरच्या आयुष्यात सचिनचं नाव जगातल्या जवळपास प्रत्येत माध्यमात प्रसिद्ध झालं. नुसतं प्रसिद्ध झालं नव्हे, तर त्याच्या उत्तुंग कारकिर्दीमुळे माध्यमांनी त्याला जणू डोक्यावरच घेतलं, पण सचिनचं नाव पहिल्यांदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होतं ते एका चुकीमुळे. 1987 सालची गोष्ट आहे. मुंबईच्या स्थानिक मॅचेससाठी वृत्तपत्रांनी नियम केला होता, की ज्या क्रिकेटपटूने मॅचमध्ये किमान 30 रन्स केले असतील, अशाच क्रिकेटपटूचं नाव बातमीत प्रसिद्ध केलं जाईल. सचिनने मुंबईच्या स्थानिक मॅचमध्ये नाबाद 24 रन्स केले आणि तेव्हा मॅच संपली. कारण त्याची टीम जिंकली होती. टीमला वाइड, लेगबाइज आणि नोबॉल असे अतिरिक्त रन्स खूप मिळाले होते. मॅचच्या स्कोअररने ठरवलं, की अतिरिक्त सहा रन्स सचिनच्या खात्यावर जमा करायचे आणि त्याने तसं केलंही. टीमच्या एकूण रन्सच्या संख्येत काहीही बदल न करता अतिरिक्त रन्समधले सहा रन्स कमी करून स्कोअररने ते सचिनच्या नावावर मांडले. त्यामुळे त्याचा स्कोअर नाबाद 30 असा झाला. वास्तविक पाहता ही चूक होती, तरी त्या टीमने मॅच जिंकलेली असल्यामुळे या बदलामुळे काहीच फरक पडणार नव्हता. असा विचार करून स्कोअररने हे केलं होतं. यामुळे सचिनच्या रन्स 30 झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातल्या बातमीत त्याचं नाव प्रसिद्ध झालं. ते पाहून सचिनच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

(वाचा - पुणेकरांसाठी भज्जीचा पुढाकार, अधिकाधिक कोरोना चाचण्या होण्यासाठी केली मोलाची मदत)

पहिली कार

आज सचिनकडे कार्सचा ताफाच आहे आणि त्यात एकाहून एक जबरदस्त कार्स आहेत. पण फार कमी जणांना माहिती असेल, की सचिनची पहिली कार होती मारुती 800 आणि तीही सेकंड हँड. 1990 ची गोष्ट, सचिन इंग्लंडवरून कसोटीतलं पहिलं शतक झळकावून परतला होता. संपूर्ण देशभर त्याचं नाव झळकत होतं. त्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याने सेकंड हँड मारुती 800 कार (Maruti 800) खरेदी केली. तेव्हा त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. बांद्र्याच्या साहित्य सहवास (Sahitya Sahawas) कॉलनीत राहणाऱ्या सुनील नावाच्या सचिनच्या मित्राने आठवण सांगितली, की तेव्हा इंग्लंडवरून (England) परतल्यानंतर सचिन ही कार घेऊन त्याच्याकडे आला होता आणि ते दोघेही ड्रायव्हिंग करायला गेले होते.

बालपणीच्या मित्रांची साथ सोडलेली नाही

मुंबईच्या साहित्य सहवास कॉलनीमध्ये सचिनचं बालपण गेलं. त्या वेळी सचिन ज्यांच्यासोबत खेळत मोठा झाला, त्यांच्याशी असलेली त्याची दोस्ती आजही कायम आहे. सचिनचं कुटुंब आज साहित्य सहवासमध्ये राहत नाही, पण ते घर सचिनने विकलेलं नाही. फोटोग्राफर अविनाश गोवारीकर, काँट्रॅक्टर सुनील हर्षे हे सचिनचे बालपणापासूनचे मित्र. त्यांच्यासोबत सचिन प्रचंड मस्ती करायचा. त्यामुळे हे त्रिकूट कॉलनीत प्रसिद्ध होतं. झाडांवरची फळं चोरून खाण्यासारखे उद्योगही ही मंडळी करायची. एका रविवारी जेव्हा कॉलनीतले सगळे जण 'गाइड' सिनेमा पाहण्यात मग्न होते, तेव्हा ही टोळी झाडावर चढून आंबे काढण्यात गर्क होती. त्या झाडाची फांदी तुटली आणि मोठा आवाज झाला. म्हणून सगळे जण बघायला आले, तोपर्यंत या त्रिकूटाने पोबारा केला होता. सचिनची पत्नी अंजलीही साहित्य सहवासमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होते. सचिनची मुलगी सारा हिचा पहिला वाढदिवसही साहित्य-सहवासमध्येच साजरा करण्यात आला होता. त्या सोहळ्यात कॉलनीतले सगळे लोक सहभागी झाले होते.

चॅरिटी

सचिन तेंडुलकरचं समाजकार्यही (Charity) मोठं आहे. समाजकल्याणाचं काम करणाऱ्या अनेक संस्थांशी सचिन जोडलेला आहे. आपल्या कमाईचा एक भाग तो या कामासाठी राखून ठेवतो आणि त्यासाठीच खर्च करतो. त्या कामांसाठी तो वेळही काढतो. मुंबईतल्या अपनालय या स्वयंसेवी संस्थेतल्या सुमारे 200 मुलांच्या शिक्षणाचा खर्च सचिनने उचलला आहे. आपल्या वडिलांना वेतन कमी असलं, तरी त्यातही ते अशा प्रकारची मदत करायचे, याची आठवण सचिनने एका कार्यक्रमात काढली होती. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते. घरोघरी पेपर टाकणाऱ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च ते करायचे, असं सचिनने सांगितलं होतं.

First published:

Tags: Sachin Tendulkar (Cricket Player)