नवी दिल्ली, 29 मार्च: ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell-Vini Raman marry with Indian rituals) याने रविवारी भारतीय परंपरेने प्रेयसी विनी रमण हिच्यासोबत लग्न केले. 18 मार्चला या दोघांनी ऑस्ट्रेलियन परंपरेनुसार लग्न केले होते, पण त्यांनी 27 मार्चला तमिळ पद्धतीने विवाह केला. त्यांच्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये दोघांनीही भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केले आहेत. बॅकग्राऊंडला तमिळ संगीत वाजत आहे. विशेष म्हणजे मॅक्सवेल वाजत, गाजत वरात घेऊन आला आणि विनीच्या गळ्यात माळ घालताना दिसत आहे.
ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण हे एकमेकांना मागील चार वर्षांपासून ओळखतात आणि फेब्रुवारी2020 मध्ये त्यांनी साखरपुडा उरकला होता. विनी ही मेलबर्न येथे राहणारी असून ती ऑस्ट्रेलियात फार्मासिस्ट आहे. कोरोना व्हायरसमुळे या दोघांना लग्न अनेकदा स्थगित करावे लागले होते. पण, अखेरीस ते लग्नबंधनात अडकले.
Glenn Maxwell Malai Mattral 🤣 pic.twitter.com/Nu3ikToVRi
— Tinku Venkatesh | ಟಿಂಕು ವೆಂಕಟೇಶ್ (@tweets_tinku) March 27, 2022
कोण आहे विनी रमण? 2013 मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा गेला. भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे आणि ती मेलबर्न येथे फार्मासिस्टची प्रॅक्टीस करते. विनी ऑस्ट्रेलियातील तामिळ कुटुंबातील आहे. व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.

)







