नवी दिल्ली, 9 जुलै : पूर्व दिल्ली खासदार आणि माजी क्रिकेपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) यमुना स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नवा वाद सुरु झाला. गंभीरच्या या ट्विटनंतर तिरंदाजांनी त्याच्यावर निशाणा साधाला. गंभीरनं यमुना स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचा व्हिडीओ शेअर करत इथे क्रिकेट ग्राऊंड होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं (Deepika Kumar) तिरंदाजीचं ग्राऊंडचं क्रिकेटच्या स्टेडियममध्ये रुपांतर करु नये अशी मागणी केली होती. त्यावर अखेर गंभीरला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
काय आहे प्रकरण?
गंभीरनं यमुना स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचा एक व्हिडीओ शेअर केवला होता. 'फक्त जाहिराती कठोर परिश्रमाची जागा घेऊ शकत नाहीत. पूर्व दिल्ली प्रो क्रिकेटसाठी सज्ज आहे.' गंभीरच्या या ट्विटला दीपिका कुमारीनं उत्तर दिले. 'मी 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये याच मैदानात खेळून दीपिका बनले. तिरंदाजीचं हे ग्राऊंड कृपया क्रिकेट स्टेडियम बनवू नका. हे आशिया खंडातील सर्वात चांगले तिरंदाजीचं ग्राऊंड आहे. त्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतात.'
Ads can’t substitute for intent & hard work. East Delhi ready for Pro Cricket! #DelhiNeedsHonesty pic.twitter.com/suGzZlYutN
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 7, 2021
दीपिकाच्या या ट्विटनंतर गंभीरनं स्पष्टीकरण दिले. 'यमुना स्पोर्ट्स ग्राऊंडमध्ये बदल होणार नाही. तर याला अपग्रेड करण्यात येत आबे. तिरंदाजी आणि अन्य खेळ इथे पूर्वीसारखेच होतील. एक खेळाडू या नात्याने खेळाच्या विकासात अडथळा निर्माण होईल असं कोणतंही काम मी करणार नाही.'
'41 वर्ष जुना 'तो' नंबर बंद करणार', वाचा PT उषा यांनी का दिला टोकाचा इशारा
गंभीरच्या या स्पष्टीकरणानंतर दीपिका कुमारी, अतनू दास या तिरंदाजांनी त्याचे आभार मानले आहेत. हे मैदान तिरंदाजांचं घर कायम असेल, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Gautam gambhir, Sports