IND vs ENG: चार दिवसांत पहिल्यांदाच दिसली 'मॅन ऑफ द मॅच'ची बायको; प्रीती अश्विनची रिअ‍ॅक्शन वाचाच...

IND vs ENG: चार दिवसांत पहिल्यांदाच दिसली 'मॅन ऑफ द मॅच'ची बायको; प्रीती अश्विनची रिअ‍ॅक्शन वाचाच...

IND vs ENG: गेल्या चार दिवसांपासून आर अश्विनची पत्नी (R Ashwins Wife) एकदाही टीव्ही स्क्रिनवर दिसली नाही. तिला टीव्ही कॅमेऱ्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या चार दिवसांपासून आर अश्विनची पत्नी प्रीती अश्विन (Prithi ashwin) स्टेडियममध्ये उपस्थित राहून टीम इंडियाला आणि आपल्या पतिला पाठिंबा देत होती.

  • Share this:

चेन्नई, 16 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंडचा (Ind Vs Eng) दुसरा कसोटी सामना (2nd Test) नुकताच पार पडला आहे. भारताने पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढला असून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताचा लेग स्पीनर आर अश्विनने (R Ashwin) अष्टपैलू खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याने दुसऱ्या डावात शतकी खेळी साकारत या कसोटीत एकूण 8 प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनने सुरुवातीपासूनच स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. गेल्या चार दिवसांपासून त्याने आपल्या गोलंदाजीने इंग्लंडच्या संघावर पकड मजबूत तर ठेवलीच होती. शिवाय 106 धावांची संयमी खेळी साकारत संघात मोलाचं योगदानही दिलं आहे. असं असतानाही गेल्या चार दिवसांत आर अश्विनची पत्नी आपल्याला एकदाही टीव्ही स्क्रिनवर दिसली नाही. खरंतर चारही दिवस ती स्टेडियममध्ये उपस्थित राहून टीम इंडियाला आणि आपल्या पतिला पाठिंबा देत होती.

(वाचा - IND vs ENG : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा फसला स्टोक्स, इंग्लंडची टीम मोठ्या संकटात)

मात्र तिच्यावर स्टेडियममधील कॅमेऱ्यांची नजर तिच्यावर एकदाही पडली नाही. एरवी विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) किंवा रोहित शर्माची (Rohit sharma) पत्नी रितीका साजदेह (Ritika Sajdeh) यांच्यावर अनेकदा कॅमेऱ्याच्या नजरा जातात. पण गेल्या चार दिवसांत फक्त एकदाच कॅमेऱ्याची नजर आर अश्विनची पत्नी प्रीतीवर (Prithi Ashwin) गेली आहे. या चार दिवसांत मैदानातला कॅमेरा अनेकदा रोहित शर्माची पत्नी रितीकावर गेला आहे. हाच दुजाभाव एका ट्वीटर वापरकर्त्याने बरोबर टिपला आहे. त्याने एक ट्वीट करत म्हटलं की, 'गेल्या चार दिवसांपासून आर अश्विन मैदानात अष्टपैलू खेळी करत असताना, मैदानातील कॅमेऱ्याने शेवटी एकदाचं अश्विनच्या पत्नीला टिपलं आहे, जे गेली चार दिवस तिला टाळण्याचा प्रयत्न  करत होते.'

संबंधित वापरकर्त्याच्या ट्वीटनंतर अश्विनची पत्नी प्रीती अश्विनने प्रतिक्रिया दिला आहे. तिने ट्वीट करत म्हटलं की, 'बहुदा ते माझा चेहरा विसरले असावेत' असं लिहून तिने एक हसणारा इमोजी जोडला आहे. तिचं हे ट्वीट आता इंटरनेटवर वेगात व्हायरल होतं असून अनेक नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 16, 2021, 2:47 PM IST

ताज्या बातम्या