Home /News /sport /

रणजी टीममध्ये निवडीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा, माजी क्रिकेटपटूला अटक

रणजी टीममध्ये निवडीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा, माजी क्रिकेटपटूला अटक

cricket

cricket

सुरतच्या (Surat) आर्थिक गुन्हे शाखेने हिमाचल प्रदेशमधील माजी रणजी ट्रॉफी खेळाडू सपना रंधावाला (Former Ranji Trophy player Sapna Randhawala) सूरतमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देऊन 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 जानेवारी: सुरतच्या (Surat) आर्थिक गुन्हे शाखेने  हिमाचल प्रदेशमधील माजी रणजी ट्रॉफी खेळाडू सपना रंधावाला (Former Ranji Trophy player Sapna Randhawala) सूरतमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देऊन 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील लालभाई क्रिकेट अकादमीमध्ये खेळणारा क्रिकेटपटू भाविक पटेल याने 20 जानेवारीला सुरत शहर गुन्हे शाखेकडे रंधवाविरोधात तक्रार दाखल केली होती. रणजी ट्रॉफी क्रिकेट सामने, टी20 चा एकच सामना, तीन एकदिवसीय सामने आणि कसोटी क्रिकेटचे दोन सामने खेळू देण्यासाठी सपनाने आपल्याकडून 27 लाख रुपये घेतल्याचा आरोप पटेल यांनी आपल्या तक्रारीत केला होता. रंधावाला ट्रान्झिट रिमांडवर सुरतला आणून गुरुवारी सुरत जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुरत न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 2018 मध्ये भाविक पटेल यांची ओळख सपना रंधावाला यांच्याशी झाली होती. 2019 मध्ये हैदराबादमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशन संघाविरुद्ध नागालँड क्रिकेट असोसिएशनकडून फक्त एकच रणजी ट्रॉफी सामना खेळला असल्याचा दावा पटेलने केला. जेव्हा त्याने रंधावाला इतर सामन्यांबद्दल विचारले तेव्हा तिने वेगवेगळी सबबी सांगितली आणि नंतर त्याचे फोन कॉल घेणे बंद केले, असा आरोप पटेल यांनी केला. भाविक पटेलची सपना रंधावाशी ओळख राम चौहान नावाच्या एका व्यक्तीने केली होती. ज्याने 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये पटेल देखील खेळला होता. रंधावाने पटेलला सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपल्याला रोख पैसे द्यावे लागतील. सपना रंधवाने आधी 12 लाख 10 हजार रुपये घेतले होते, त्यानंतर सपना रंधवाने ते पैसे दुसऱ्याला दिले. यानंतर भाविक पटेलला नागालँडकडून सामना खेळवण्याचे आमिष दाखवून अन्य एका व्यक्तीने 15  लाख रुपये घेतले, ज्याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर यांनी सांगितले की, या लोकांनी क्रिकेट करियर बनवण्याच्या नावाखाली भाविक व्यतिरिक्त सुमारे 20 खेळाडूंची 75 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Cricket news, Crime, Money fraud, Ranjit campionship

    पुढील बातम्या