Home /News /maharashtra /

शिर्डीत दगडाने ठेचून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

शिर्डीत दगडाने ठेचून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे.

शिर्डी, 13 जून : शिर्डीमध्ये एका अज्ञात इसमाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे. अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत पडलेल्या या साधारण 40 वर्षीय इसमाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यानी घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्कॉड आणी फॉरेन्सिक विभागानेही आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला आहे. भयानक घटनेची आठवण हत्या झालेल्या इसमाची अजूनही ओळख पटली नसून ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणाहून केली, याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत. काही वर्षांपूर्वी शिर्डीत सात भिकाऱ्यांची अशाच प्रकारे डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याने शिर्डी सीरयल किलींगमुळे हादरली होती. आजच्या या घटनेमुळे पुन्हा शिर्डीकर धास्तावले आहेत. हेही वाचा - तलवारी आणि कोयत्यासह घरांवर हल्ला; लहान मुलगा जखमी, परिसरात भीतीचं वातावरण दरम्यान, अहमदनगरसह नाशिक आणि नागपुरातही लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी हत्येच्या नव्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Shirdi, Shirdi news

पुढील बातम्या