मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

MS Dhoni: पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसत आहे.

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसत आहे.

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीने साजरा करण्यात आला. धोनीने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मंद स्मितहास्य करत केक (MS Dhoni Birthday) कापला.

खरं तर, धोनी आणि साक्षीच्या लग्नाचा वाढदिवस 4 जुलैला होता. दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. सध्या हे जोडपे सुट्ट्यांसाठी इंग्लंडमध्ये आहे. इथे दोघांनी लग्नाचा वाढदिवसही साजरा केला आणि आता धोनीचा वाढदिवसही साजरा केला.

साक्षीने स्वतः धोनीचा व्हिडिओ शेअर केला -

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसत आहे. पंत सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. एक कसोटी सामना झाला असून आता तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

धोनीने दोन्ही हातांनी केक कापला

साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने चमकदार जॅकेट घातलेले दिसत आहे. सगळीकडे विद्युत रोषणाई दिसत आहे. धोनीसाठी एक अप्रतिम केक सजवण्यात आला होता. धोनी आधी मेणबत्ती विझवतो आणि त्यानंतर दोन्ही हातांनी चाकू धरून केक कापताना दिसतो. यादरम्यान व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये इंग्रजी संगीतही वाजत आहे.

धोनी आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता -

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी 2019 वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली होती. तरीही माही आयपीएलमध्ये खेळत आहे. तो सध्या चेन्नई संघाचा कर्णधारही आहे. याच मोसमात धोनीने आयपीएलमध्येच शेवटचा सामना खेळला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने 26 धावा केल्या होत्या. हा सामना त्याच्या संघाने गमावला.

हे वाचा - इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा धक्का, एका चुकीने पाकिस्तानचा फायदा

माही भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार -

धोनी हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली देशासाठी तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली प्रथम 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.

First published:

Tags: Mahendra singh dhoni, MS Dhoni, Sakshi dhoni