Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

फूटबॉलचं मैदान झालं Romantic! मॅनेजरने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, संपूर्ण टीम पोस्टर घेऊन उभी

फूटबॉलचं मैदान झालं Romantic! मॅनेजरने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, संपूर्ण टीम पोस्टर घेऊन उभी

फूटबॉल टीमचा मॅनेजर सेल्सो रफाएल अयाला (Celso Rafael Ayala) याने आपली गर्लफ्रेंड लिली बेनिटेज (Lili Benitez) हिला प्रपोज करण्यासाठी (Proposal in Football Ground) आपल्या टीमचा उपयोग करून घेतला.

फूटबॉल टीमचा मॅनेजर सेल्सो रफाएल अयाला (Celso Rafael Ayala) याने आपली गर्लफ्रेंड लिली बेनिटेज (Lili Benitez) हिला प्रपोज करण्यासाठी (Proposal in Football Ground) आपल्या टीमचा उपयोग करून घेतला.

फूटबॉल टीमचा मॅनेजर सेल्सो रफाएल अयाला (Celso Rafael Ayala) याने आपली गर्लफ्रेंड लिली बेनिटेज (Lili Benitez) हिला प्रपोज करण्यासाठी (Proposal in Football Ground) आपल्या टीमचा उपयोग करून घेतला.

मुंबई, 31 ऑगस्ट : 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं...' कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या या ओळींप्रमाणे प्रेम ही भावना सारखीच असली, तरी प्रत्येकाची ते व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रियकर-प्रेयसीमधल्या प्रेमाबद्दल बोलायचं झालं, तर कोणी अगदी वर्षानुवर्षं चालत आलेल्या फूल देण्याच्या पद्धतीने प्रपोझ करतं, तर कोणी काही तरी सरप्राइज प्लॅन करून तो दिवस जन्मभर आठवणींच्या कप्प्यात सुरक्षित जपला जाईल, अशी व्यवस्था करतं. कथा-कादंबऱ्या आणि सिनेमांमध्ये असे खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला असे प्रकार थेट घडताना पाहायला मिळत नसले, तरी कोणाचे ना कोणाचे याबद्दलचे अनुभव ऐकायला मिळतात. पॅराग्वेमध्ये नुकताच असा एक प्रसंग घडला, ज्यात प्रियकराने प्रेयसीला प्रपोझ करण्यासाठी एक मोठंच सरप्राइज प्लॅन केलं होतं.

ही गोष्ट आहे पॅराग्वेतल्या एका फुटबॉल टीमच्या मॅनेजरची. रिव्हर प्लेट नावाच्या टीमचा मॅनेजर सेल्सो रफाएल अयाला (Celso Rafael Ayala) याने आपली गर्लफ्रेंड लिली बेनिटेज (Lili Benitez) हिला प्रपोज करण्यासाठी आपल्या टीमचा उपयोग करून घेतला. फुटबॉलमध्ये असं म्हटलं जातं, की कॅप्टनपेक्षाही मॅनेजरचा रोल महत्त्वाचा असतो; पण कोणी मॅनेजर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी आपल्या फुटबॉल टीमचा वापर करून घेईल, याचा कोणी विचारही केला नसेल. एका मॅचपूर्वी मॅनेजरने आपल्या टीममधल्या खेळाडूंच्या हातात पोस्टर्स दिले होते आणि त्यावर लिहिलं होतं, 'लिली, माझ्याशी लग्न करशील?'

" isDesktop="true" id="598939" >

अर्थातच, ती मॅच पाहायला सेल्सोची गर्लफ्रेंड (Girlfriend) लिली येणारच होती. ती आल्यावर तिला खूप मोठं सरप्राइज मिळालं. फुटबॉल टीमचे खेळाडू अशी पोस्टर्स घेऊन उभे असतील, अशी कल्पनाही तिने केली नव्हती. त्यानंतर सेल्सोने गुडघ्यांवर बसून आपल्या गर्लफ्रेंडला रिंग देऊन प्रपोज केलं.

लिली हे सगळं पाहून भारावून गेली. तिने हे प्रपोजल (Proposal) स्वीकारलं. त्यानंतर सगळ्या खेळाडूंनी आपल्या मॅनेजरला शुभेच्छा दिल्या. लिली आणि सेल्सो तर भावूक झालेच होते; पण काही खेळाडूही भावूक झाल्याचं दिसलं. रिव्हर प्लेट स्टेडियममध्ये घडलेला हा प्रसंग टिगो स्पोर्ट्सच्या कॅमेऱ्याने टिपला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरलही (Viral Video) झाला. नेटिझन्सना सेल्सोचं हे सरप्राइज खूप भावलं.

हे सगळं झाल्यामुळे मॅनेजर खूश झाला होता; पण त्याच्या खुशीला गालबोट लागलं ते त्याच्या टीमच्या पराजयाचं. Guarani टीमविरुद्ध असलेला सामना रिव्हर प्लेट टीम हरली. प्रपोजलचं नाट्य झाल्यानंतर ही मॅच खेळली गेली होती. त्या स्पर्धेत आता रिव्हर प्लेट टीम तिसऱ्या स्थानावर आहे. पुढच्या सामन्यात आपली टीम अधिक चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन करील, अशी आशा सेल्सोने व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Football