वीज पडून 'या' दिग्गज खेळाडूचा स्टेडियमवरच मृत्यू, क्रीडा क्षेत्राला धक्का

वीज पडून 'या' दिग्गज खेळाडूचा स्टेडियमवरच मृत्यू, क्रीडा क्षेत्राला धक्का

ते विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे देत असतानाच एक वीज कडाडली आणि मैदानात कोसळली. त्यात या दिग्गज खेळाडूचा मृत्यू झाला.

  • Share this:

धनबाद 21 ऑक्टोंबर : फुटबॉलचे दिग्गज कोच आणि खेळाडू अभिजीत गांगुली (Abhijit Ganguli) यांचं आज स्टेडियमवरच वीज कोसळल्याने निधन झालं. गांगुली हे माजी संतोष ट्रॉफी (Santosh Trophy) खेळाडू आहेत. गांगुली हे मुलं आणि मुलींना मैदानावर प्रशिक्षणदेत असतानाच ही दुदैवी घटना घडली. शहरातल्या प्रसिद्ध बिरसा मुंडा स्टेडियम (Birsa Munda Stadium) वर ते नियमित प्रशिक्षण देत असतं. ते धनबाद रेल्वे विभागाचे कोच होते.त गांगुली यांच्या निधनामुळे फुटबॉल विश्वाला धक्का बसलाय. गांगुली यांनी झारखंमधून अनेक चांगली फुटबॉलपटू निर्माण केले होते. या खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली होती.अभिजित गांगुली हे दररोजच्या प्रमाणेच सकाळी बिरसा मुंडा स्टेडियमवर प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. सराव सुरू होता तेव्हा आभाळ भरून आलं होतं आणि पावसाची रिपरिपही सुरू होती. मात्र पावसाळी वातावरण असतानाही त्यांचं प्रशिक्षण काही थांबल नव्हतं.

रोहितचं द्विशतक संपवणार दोन मित्रांचे कसोटी क्रिकेट!

ते विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे देत असतानाच एक वीज कडाडली आणि मैदानात कोसळली. त्यात गांगुली यांच्यासह काही खेळाडू सापडले. यावेळी त्यांच्यासोबत मैदानात राष्ट्रीय फुटबॉलपटू लाल हेम्ब्राम (Ravi Lal Hembram) आणि चंदन टुडू (Chandan Tudu) हेही होते मात्र त्यातून सुदैवाने ते बचावले.

गांगुली मात्र बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांना इतर सहकाऱ्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि आई आहे. 993मध्ये त्यांनी संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप (Santosh Trophy National Football Championship) स्पर्धेत बिहारचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Amazonचा सगळ्यात मोठा Diwali Sale उद्यापासून, Smart Phone वर जबरदस्त ऑफर

1990 मध्ये त्यांची सर्वश्रेष्ठ डिफेंडर्स म्हणून ओळख होती. त्यानंतर त्यांना रेल्वेत नोकरी लागली. नोकरीत असतानाही रेल्वेच्या विविध विभागातून त्यांनी खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देत उत्तम फुटबॉपटू घेडवले होते. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विभागापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत उत्तम कामगिरी बजावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या