मुंबई, 20 डिसेंबर : अर्जेंटिनाने 36 वर्षांनी फिफा वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता ते ट्रॉफीसह मायदेशी परतले आहेत. संघाच्या या विजयानंतर देशभरात सेलिब्रेशन सुरू आहे. फिफा फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटवर 4-2 ने हरवलं होतं. खेळाडू अर्जेंटिनात पोहोचल्यानतंर त्यांच्या स्वागतासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ओपन बसमध्ये बसवून खेळाडू मिरवणुकीत मध्यभागी होते. अर्जेंटिनाचे खेळाडू हात हलवून चाहत्यांचे आभार मानत होते. याचवेळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
ओपन बसमधून अर्जेंटिनाचे खेळाडू जात असताना अचानक वीजेची तार समोर आली. पण खेळाडूंच्या लक्षात येताच ते लगेच खाली वाकले आणि सावरले. ओपन बसच्या ज्या भागात ही वीजेची तार आडवी आली तिथे मेस्सी, डी मारिया, परेडेज, रॉड्रिग्ज डी पॉल आणि निकोल्स ओडमेंड बसले होते.
Messi even dribbled the overhead wires while on the roof of a bus.😜 See danger, let's dribble past. pic.twitter.com/GW0Xnks5gh
— Semper 🐐🇦🇷 (@SemperFiMessi) December 20, 2022
हेही वाचा : जमत नसेल तर केळी, अंडी विका; कपिल देव क्रिकेटपटूंवर भडकले
हजारोंच्या संख्येनं अर्जेंटिनाच्या खेळाडुंच्या स्वागताला चाहते आले होते. तेव्हा बसच्या समोर जी तार आली त्यामुळे खेळाडूंना दुखापतही झाली असती किंवा वीजेचा धक्काही बसला असता. मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे पाचही खेळाडूंनी तार आडवी येताच स्वत:ला वाचवलं.
सोशल मीडियावर खेळाडूंचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर चाहतेसुद्धा उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी खेळाडू सुरक्षित असल्याने दिलासा व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup