मुंबई, 19 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या सामन्यात मेस्सीने फ्रान्सवर पहिला गोल केला. यासह त्याने इतिहास रचला. अखेरचा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मेस्सीने २३ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. फ्रान्सला अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून ३६ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला. यासोबत मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. मेस्सीने गोल्डन बॉल जिंकला असून दोन वेळा गोल्डन बॉल जिंकणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे. मेस्सीने कतार वर्ल्ड कपमध्ये सहावा गोल केला आणि एका फिफा वर्ल्ड कपच्या एका एडिशनमध्ये ग्रुप स्टेज, राउंड ऑफ १६, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचा हा पाचवा वर्ल्ड कप असून आतापर्यंत त्याने १२ गोल नोंदवले आहेत. क्रोएशियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये त्याने अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याची कामगिरी केली होती. हेही वाचा : अखेर मेस्सीची स्वप्नपूर्ती, अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये मेस्सीने ६ पैकी ४ गोल हे पेनल्टीवर केले आहेत. लीग स्टेजमध्ये मेस्सीने पहिला गोल सौदी अरेबियाविरुद्ध केला होता. त्यानंतर दुसरा गोल मेक्सिकोविरुद्ध केला होता. तर राउंड ऑफ १६ मध्ये तिसरा गोल ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँड, सेमीफायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध गोल केले होते. तर फायनलमध्ये फ्रान्सविरुद्ध पहिला गोल नोंदवत त्याने अनोखा विक्रम नोंदवला.
फ्रान्सविरुद्ध मैदानावर उतरताच मेस्सीने मोठा विक्रम केला. . फ्रान्स आणि अर्जेंटिनाविरुद्धचा त्याचा वर्ल्ड कपमधील २६ वा सामना होता. यासह त्याने जर्मनीच्या लोथार मथाउसचा विक्रम मोडला.