आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतातल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारं ट्विट केल्यामुळे भारतातल्या अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर टीका केली आहे, यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण रिहाना आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे. (badgalriri/Instagram)
पॉप स्टार रिहाना वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्रेग ब्रॅथवेट आणि कार्लोस ब्रॅथवेट यांच्यासोबत शाळेत एकाच वर्गात शिकली आहे. 2019 वर्ल्ड कप दरम्यान रिहाना श्रीलंकेविरुद्धच्या मॅचवेळी वेस्ट इंडिजला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यावेळी रिहानाने वेस्ट इंडिजच्या टीमसोबत वेळ घालवला आणि फोटोही काढले. (Windies Cricket/Twitter)
रिहानाची संपत्ती 60 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेत जवळपास 44 अरब रुपये आहे. आतापर्यंत रिहानाला 9 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. तसंच तिने 13 अमेरिकन म्युजिक अवॉर्ड, 12 बिलबोर्ड म्युजिक अवॉर्ड आणि 6 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही पटकावले आहेत. रिहानाला असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ कर्लड पिपल इमेज अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं आहे. (badgalriri/Instagram)