मुंबई, 3 मार्च : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताला दोन्ही डावात फक्त 109 आणि 163 धावाच करता आल्या. तर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 9 गडी राखून सामना जिंकला आणि यासोबतच त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंदोर कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर चाहत्यांना सध्या दुखापत ग्रस्त असलेल्या रिषभ पंतची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाच्या होम ग्राउंडवर जाऊन त्यांना पराभवाची धूळ चारली होती. या मालिकेत युवा फलंदाज रिषभ पंतचा परफॉर्मन्स उल्लेखनीय होता. रिषभ पंत सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा भाग होता. परंतु 30 डिसेंबर 2022 रोजी त्याच्या कारला भीषण अपघात झाला आणि त्यात रिषभला देखील गंभीर दुखापत झाली. सध्या रिषभवर उपचार सुरु आहेत. परंतु रिषभच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या झालेल्या पराभवानंतर चाहत्यांना रिषभ पंतची आठवण होत आहे. अनेकांनी भारतच्या इंदोर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर रिषभची आठवण काढत त्याचे मिम्स शेअर करून भारतीय संघाला ट्रॉल केल आहे.
Woke up this morning...
— DK (@DineshKarthik) March 3, 2023
Well.......
RISHABH PANT
that's it, that's the tweet #INDvsAUSTest #BGT2023
Chants of Rishabh pant in the stadium 🥺 pic.twitter.com/wx0L33c6oB
— Rishabh pant fans club (@rishabpantclub) March 2, 2023
सध्या हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.