"Match Fixing साठी मिळाली होती 40 लाखांची ऑफर" भारतीय क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
"Match Fixing साठी मिळाली होती 40 लाखांची ऑफर" भारतीय क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
Match Fixing
आयपीएल आणि रणजी ट्रॉफीच्या एका माजी क्रिकेटरने (Indian cricketer) क्रिकेट जगतात खळबळजनक दावा केला आहे. तामिळनाडूकडून क्रिकेट खेळणाऱ्या 41 वर्षीय क्रिकेटरला मॅच फिक्स करण्यासाठी 40 लाखांची ऑफर देण्यात आली होती.
नवी दिल्ली, 18 जानेवारी: आयपीएल आणि रणजी ट्रॉफीच्या एका माजी क्रिकेटरने (Indian cricketer) क्रिकेट जगतात खळबळजनक दावा केला आहे. तामिळनाडूकडून क्रिकेट खेळणाऱ्या 41 वर्षीय क्रिकेटरला मॅच फिक्स करण्यासाठी 40 लाखांची ऑफर देण्यात आली होती. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटर राजगोपाल सतीश यांनी (Rajagopal Sathish) इन्स्टाग्रामवर मॅच फिक्सिंगसाठी 40 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. सतीशने यासंदर्भात बंगळुरू येथे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहितीदेखील दिली आहे.
पोलिसांना माहिती देण्याआधी यासंदर्भात सतीश यांनी बीसीसीआयला ही (BCCI) माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा एजन्सीला शोध आणि तपास करण्याचे अधिकार नसल्याने हे प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद नावाच्या व्यक्तीने 3 जानेवारी रोजी सतीशला इंस्टाग्रामवर 40 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले आणि सांगितले की दोन खेळाडूंनी आधीच ऑफर स्वीकारली आहे, परंतु राजगोपाल सतीशने ऑफर स्वीकारली. सॉरी म्हटले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.
राजगोपाल सतीश हे 41 वर्षांचे असून ते मूळचे तामिळनाडूचे आहेत. तमिळनाडूशिवाय आसामकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही खेळले आहेत.राजगोपाल सतीश हे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघाचे भाग आहेत.
इंडियन क्रिकेट लीगमध्येही खेळले आहेत. आता ते तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये सुपर गिलीजकडून खेळत आहेत. असे सांगितले जाते की, सतीश यांना या स्पर्धेतील सामने निकाली काढण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.