मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL: राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर गावसकरांची टीका, म्हणाले...

IND vs SL: राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर गावसकरांची टीका, म्हणाले...

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेनं टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटच्या एका निर्णयावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीका केली आहे.

मुंबई, 24 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेनं टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी डकवर्थ लुईस मेथडनं 47 ओव्हरमध्ये 227 रनचं आव्हान होतं. श्रीलंकेनं ते आव्हान 3 विकेट्स आणि 8 ओव्हर राखत पूर्ण केलं. या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

तिसऱ्या वन-डेपूर्वीच मालिका जिंकल्यानं टीम इंडियानं या सामन्यात एकूण 6 बदल केले होते. त्यापैकी 5 जणांनी तर वन-डेमध्ये पदार्पण केले. संजू सॅमसन (Sanju Samson),  नितीश राणा (Nitish Rana), कृष्णप्पा गौतम (K. Gowtham),  राहुल चहर (Rahul Chahar) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) या पाच जणांनी या वन-डेमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर  नवदीप सैनीलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.

गावसकरांनी सामन्यानंतर 'स्पोर्ट्स तक' शी बोलताना सांगितले की, 'यापूर्वी भारतीय टीमकडून खेळण्याची संधी मिळणे इतके सोपे नव्हते. खेळाडू त्यासाठी संपूर्ण योग्य असतील तरच पदार्पणाची संधी मिळत असे. सध्याच्या काळात कादाचित विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आम्ही मालिका जिंकली आहे. तर बेंचवरील खेळाडूंना संधी का देऊ नये? असा विचार मॅनेजमेंट करत असेल,' असे गावसकर यांनी सांगितले.

द्रविडच्या निर्णावर टीका

टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांना विश्रांती दिली. तर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) खेळवलं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर गावसकरांनी टीका केली आहे. 'आपल्याकडे दीपक चहरसारखा पर्याय आहे. त्याने मागील सामन्यात क्षमता सिद्ध केली आहे. भुवनेश्वर कुमारनं देखील काही सामने बॅटींगच्या जोरावर जिंकून दिले आहेत. पण, टीम मॅनेजमेंटनं त्यांना ऑल राऊंडर म्हणून कधीही संधी दिलेली नाही.

Tokyo Olympics : चक दे इंडिया! पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडवर थरारक विजय

मागील दोन-तीन वर्षांमध्ये मॅनेजमेंटच्या सर्व आशा या एकाच खेळाडूवर आहेत. आपण फक्त त्याच्याच फॉर्मचा विचार करतो. दीपक चहरला संधी द्या तो कदाचित ऑल राऊंडर ठरु शकेल', असं मत गावसकरांनी व्यक्त केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Sunil gavaskar