जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स यांच्यात सिक्स मारण्याचं चॅलेंज; पाहा कोण जिंकलं?

VIDEO : प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स यांच्यात सिक्स मारण्याचं चॅलेंज; पाहा कोण जिंकलं?

VIDEO : प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स यांच्यात सिक्स मारण्याचं चॅलेंज; पाहा कोण जिंकलं?

कसोटीआधी इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात सिक्स हिटिंग चॅलेंज झालं. यामध्ये दोघेही प्रत्येकी पाच चेंडू खेळले. याचा निकाल आश्चर्यचकीत करणारा होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 डिसेंबर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना आजपासून सुरू झाला आहे. या मालिकेत इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. रावळपिंडी कसोटी 74 धावांनी तर मुल्तान कसोटीत 26 धावांनी विजय मिळवला होता. मालिका जिंकली असल्याने इंग्लंडचा संघ दबावाखाली नसेल, त्यामुळे या सामन्यात त्यांचा खेळ आणखी आक्रमक दिसू शकतो. दरम्यान, सामन्याआधी सराव करताना त्याची खास झलक दिसून आली. कराचीत इंग्लंड संघाच्या सरावावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कसोटीआधी इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात सिक्स हिटिंग चॅलेंज झालं. यामध्ये दोघेही प्रत्येकी पाच चेंडू खेळले. याचा निकाल आश्चर्यचकीत करणारा होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पहिला चेंडू मारता आला नाही तर प्रशिक्षकांनी जबरदस्त सिक्स मारला. प्रशिक्षक ब्रेडन मॅक्युलम यांनी 5 पैकी 4 चेंडूवर सिक्स मारले तर स्टोक्सला फक्त दोनच षटकार मारता आले. 5 चेंडू खेळून झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स तोंड लपवून बाजूला जाताना व्हिडीओमध्ये दिसतो.

जाहिरात

हेही वाचा :  फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार? ब्राझीलनंतर ६० वर्षांनी फ्रान्सला इतिहास घडवण्याची संधी पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने रेहान अहमदला पदार्पणाची संधी दिली आहे. रेहान इंग्लंडचा सर्वात कमी वयाचा कसोटी क्रिकेटपटू बनला आहे. सध्या रेहान हा 18 वर्षे 126 दिवस वयाचा आहे आणि त्याने इंग्लंडचा क्रिकेटपटू ब्रायन क्लोजचा 73 वर्षांचा विक्रम मोडला आहे. क्लोज यांनी 1949 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. तेव्हा त्यांचे वय 18 वर्षे आणि 149 दिवस इतकं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात